कुर्ल्यातील उड्डाणपुलाला मेजर कौस्तुभ राणेंचे नाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2018
Total Views |


 

मुंबई: अतिरेक्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेले मेजर कौस्तुभ राणे यांचे कुर्ल्यातील उड्डाणपुलाला नाव देण्याच्या निर्णयाला स्थापत्य समितीने मान्यता दिली आहे. आयुक्तांच्या अभिप्रायानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. काश्मिरच्या बांदीपुरातील गरेज सेक्टरमध्ये दशहतवाद्यांना रोखताना मेजर कौस्तुभ राणे हुतात्मा झाले होते. वयाच्या 29 व्या वर्षी त्यांना वीरमरण आले.

 
भारतीय सीमा रेषेवर कार्यरत असताना दशवाद्यांची घुसखोरी रोखताना आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या हुतात्मा राणे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सेना पदक प्रदान करण्यात आले होते. देशाचे रक्षण करणाऱ्या या राष्ट्रभक्त वीरपुरुषाची स्मृती चिरंतर राहावी म्हणून कुर्ला येथील कुर्ला-सांताक्रुझ टर्मिनस रोड ते स. गो. बर्वे मार्गाला जोडणाऱ्या उड्डाणपुलास ‘मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे उड्डाण पूल’ असे नाव द्यावे, अशी मागणी सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांनी स्थापत्य समितीच्या बैठकीत केली होती. स्थापत्य समितीने ही मागणी मंजूर केली असून आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पालिका आयुक्तांकडे पाठवली आहे. आयुक्तांच्या अभिप्रायानंतर उड्डाणपुलाला नाव देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@