कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा द्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2018
Total Views |



ठाणे : गणेशोत्सव काही दिवसांवर आला असताना, शहरातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या जास्त असते. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष गाड्याही सोडण्यात आल्या आहेत, मात्र या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा दिला जात नसल्याच्या निषेधार्थ दिवा प्रवासी संघटना आक्रमक झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून दिवा प्रवाशांना मिळालेल्या सापत्न वागणुकीच्या निषेधार्थ येथील प्रवासी आज काळ्या फिती लावणार आहेत. वारंवार विनंती आणि तक्रारी करूनही यंदा दिव्यात विशेष गाड्यांची पुरेशी सोय नसल्याने येथील प्रवासी आक्रमक झाले आहेत.

 

दिवा रेल्वेस्थानकात थांबा दिल्यास कल्याण-डोंबिवलीसह अंबरनाथ, बदलापूर आणि पलीकडील शहरात मोठ्या प्रमाणात कोकणवासीय असल्याने या प्रवाशांना दिलासा मिळेल. यासंबंधी रेल्वेशी पत्रव्यवहार करूनही रेल्वेकडून काहीच प्रतिसाद न आल्याने दिवा प्रवासी संघटना आक्रमक झाली आहे. रत्नागिरी, सावंतवाडी, मडगाव या भागात जाणाऱ्या गाड्यांना किमान या स्थानकात थांबा द्या, अशी या प्रवाशांची मागणी होती, परंतु रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही. गेल्या दोन वर्षांपासून स्थानकात थांबणाऱ्या दोन गाड्यांना केवळ थांबा देण्यात आला आहे, परंतु पाच विशेष गाड्यांना थांबा देण्याच्या मागणीबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, या निषेधार्थ प्रवासी आज काळ्या फिती लावणार आहेत.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@