मध्य रेल्वेची केरळला ६ कोटी ६२ लाखांची मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2018
Total Views |
 
जळगाव, ७ सप्टेंबर :
केरळमध्ये आलेल्या नैसर्गिक संकटाने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून शेकडो रहिवाशांना आपला जीव गमवावा लागला. या संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी रेल्वेचे पाच विभाग धावून आले असून मध्यरेल्वेने केरळला ६ कोटी, ६२ लाख ४८ हजारांची मदत दिली आहे.
 
 
रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी रेल्वे विभागाने केरळसाठी सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने खाद्यान्य व जीवनावश्यक साहित्य पोहचविण्यासाठी रेल्वे विभाग सरसावला. ५ सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेच्या पाचही विभागांनी मोफत ८४९.२३ टन साहित्य ३५ विशेष पार्सल गाड्यंानी केरळला रवाना केले. त्यात मुंबई विभाग ३१७.३५ टन साहित्य १४ पार्सल गाडया, पुणे १३१.३० टन साहित्य ४ पार्सल गाडया, भुसावळ विभागातून १७ पार्सल गाडयांमधून ३५१.८८ टन साहित्य, नागपूर ३९.४४ टन व सोलापूर विभागातून ९.२६ टन जीवनावश्यक साहित्य केरळला रवाना करण्यात आले. मध्य रेल्वेच्या कर्मचार्‍यांनी त्यांच्या ऑगस्ट महिन्याच्या वेतनातून ६ कोटी ६२ लाख ४७ हजार, २५० रुपये निधी केरळसाठी पंतप्रधान राष्ट्रीय निधीत सुपूर्द केला आहे. तसेच १४ टँक वॅगनव्दारे पाणीसुध्दा केरळला पाठविण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@