साकळीला एटीएसद्वारे सूर्यवंशी यांची चौकशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2018
Total Views |
यावल, ६ सप्टेंबर
एटीएसच्या पथकाने गुरुवारी दुपारी तालुक्यातील साकळी येथील एका २८ वर्षीय तरूणास चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. वासुदेव सूर्यवंशी असे या तरुणाचे नाव असून पथकाने त्याच्या घराची झडती घेतली.
 
 
एटीएसच्या पथकाने अचानक ही कारवाई केली आहे. वासुदेव हा कर्की (ता.मुक्ताईनगर) येथील मूळ रहिवासी आहे.
वडिलांच्या निधनानंतर तो गेल्या वीस वर्षापासून साकळी येथे मामाच्या गावी वास्तवास असून स्वत:चे मोटर गॅरेज चालवून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत आहे.
 
 
गुरूवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गावात दाखल झालेल्या एटीएसच्या पथकातील काही अधिकार्‍यांनी प्रथम त्याला ताब्यात घेतले. पथकातील अन्य अधिकार्‍यांनी वासुदेवच्या ग्रामपंचायतीच्या मागील बाजूस असलेले घर गाठत सुमारे अडीच तास बंदद्वार झाडाझडती घेतली.
या कारवाईविषयी गोपनीयता पाळत पथकाने माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना नेमके काय सापडले वा वासुदेवने त्यांना काय माहिती दिली हे कळू शकले नाही.
@@AUTHORINFO_V1@@