शाहूनगरातील स्वच्छतेकडे मनपाचे दुर्लक्ष; नागरिक त्रस्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2018
Total Views |
 
 
शाहूनगरातील स्वच्छतेकडे मनपाचे दुर्लक्ष; नागरिक त्रस्त
जळगावः
शहरातील शाहूनगरातील स्वच्छतेकडे मनपाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी गुरुवारी ‘तरुण भारत’ जवळ व्यक्त केली. शाहूनगरकडून पिंप्राळ्याकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. शाहूनगरच्या मुख्य रस्त्यालगत मेन गटार असून त्याची स्वच्छता महिन्याभर होत नाही. तसेच कचरा व्यवस्थापन पण नीट होत नाही.
 
 
बर्‍याचवेळा येथील रहिवाशांनी मनपामध्ये वेळोवेळी निवेदन देऊन आपल्या समस्याकडे लक्ष घालण्याची मागणी केली आहे. पण मनपा ने आपल्या निवेदनाकडे दुर्लक्ष केले असल्याचे म्हटले आहे.
 
 
शाहूनगरमध्ये ठिकठिकाणी कचरा पाहण्यास मिळत आहे. गटारीत मोठ्या प्रमाणात कचरा अडकून पडला आहे. शहरात डेंग्यूू सदृश्य रुग्ण आढळून आले आहेत, अशावेळी शाहूनगरमध्ये कुठला मोठा आजार होण्याची मनपा वाट पाहत आहे का..? असा संतप्त प्रश्न रहिवासी उपस्थित करत आहे.शाहूनगरमध्ये कचरा कुंडी नसल्याने तिथल्या नागरिकांना नाईलाजाने कचरा रस्त्यावर टाकावा लागतो. तसेच मुख्य नालीवर काही झाकले नसल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा सामना करावा लागतो.
 
आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी
या रस्त्याने मनपामधील अधिकार्‍यांचा मोठ्या प्रमाणात वापर असून या समस्येकडे त्यांचे दुर्लक्ष कसे असू शकते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात या नालीतून दुर्गंधी येत असते. आयुक्तांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@