स्वप्नपूर्तीसाठी कठोर परिश्रमाची गरज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2018
Total Views |

‘दान’चे दिग्दर्शक जावेद सैयद यांची ‘तरूण भारत’शी बातचीत


 
जळगाव :
चित्रपटात काम करतांना केवळ अभिनयाचा विचार न करता बाकीच्या तांत्रिक गोष्टीही यश नक्की मिळेल. प्रत्येकाला अभिनेता बनायचे असते, पण त्याची तेवढी क्षमता आहे का, याचा विचार त्याने स्वत: करायला पाहिजे. स्वत:ला सिध्द केल्यास यशाचा मार्ग अधिक सुलभ होतो, हे बोल आहेत प्रसिद्ध दिग्दर्शक जावेद सैयद यांचे.
 
 
जामनेर येेथे ‘दान’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आले असता त्यांनी ‘तरूण भारत’शी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, मुंबई ही स्वप्ननगरी असली तरी प्रत्येकाचे स्वप्न येथे पूर्ण होईल असे नाही. येथे काम करण्यासाठी आणि आपली स्पप्ने वास्तवात उतरवण्यासाठी मेहनतीची गरज असते. मुंबई ही लवकर कोणालाच आपल्या पदराच्या छायेत घेत नाही, त्यासाठी आधी तिचे होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
 
 
मुंबईत येताना मनात ठाम निर्णय करून यावे. चित्रपटात काम देतो, अशा वाक्यांपासून पर्यायाने तशा माणसांपासून दूर रहावे. जी व्यक्ती खरंच आपल्याला काम देत असेल तर अशा व्यक्तीबरोबर दोन शब्द बोलून लगेच ओळखावे की व्यक्ती कशी आहे. त्यासाठी जळगावातील आणि परिसरातील कलाकारांना संधी मिळावी म्हणून येथे आम्ही ‘दान’चे चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला. आमच्या श्री साई क्राफ्ट व्हिजन, मुंबई या प्रॉडक्शन हाऊसतर्फे जामनेरला ‘दान’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून जळगावातील कलाकार त्यात काम करत आहेत. काही चित्रीकरण जामनेर, देवपिंप्री, केकतनिंभोरा आणि जळगाव शहरातही होईल. त्यासाठी स्थानिक कलाकारांची निवड चाचणी जळगावात घेण्यात आली. त्यातून सचिन कापडे, अनिल मोरे, पार्थ ठक्कर, दीपक महाजन यांची निवड करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. अवयवदानावर आधारित या चित्रपटात मुंबई, जळगाव, सोलापूर, सांगली, अहमदनगर येथील कलाकारही सहभागी आहेत.
जामनेरात ‘दान’ चित्रपटाचे चित्रीकरण
‘दान’चे चित्रीकरण करतांना स्थानिक कलाकारांना यात संधी मिळाली पाहिजे एवढाच मानस होता. जळगावला कलाकारांची मोठी फळी असल्याचे ऐकले होते. परंतु, ते काही दिवसांत पाहिलेसुद्धा. येथील कलाकार उत्तम नट असून व त्यांना कॅमेर्‍याचे ज्ञान नसूनही त्यांनी खूप लवकर आत्मसात केले. ही कथा सत्य घटनेवर आधारित असून अशा कलाकारांचीच या चित्रपटाला गरज होती.
- जावेद सैयद, दिग्दर्शक
जळगाव शहरात आधीही येण्याचा योग आला होता. त्यावेळी वेगवेगळे लोकेशन्स बघण्यात आले होते. काही खडतर मार्गाने जाताना त्रास झाला पण जागांचे सौंदर्य पाहून तो विसरलो. ‘दान’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जैन उद्योग समूहाचाही खूप मोठा हातभार लागला असून त्यांनी वेळोवेळी सहकार्य करून चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मदत केली.
- प्रवीण अस्थाना, सहदिग्दर्शक
 
@@AUTHORINFO_V1@@