माझ्या वाक्यांचा चुकीचा अर्थ; चंद्रकांत दादांचे स्पष्टीकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2018
Total Views |

 

 

कोल्हापूर : राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काल कोल्हापूरमधील कार्यक्रमामध्ये आपण यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मात्र मी कुठलाही राजकीय संन्यास घेणार नसल्याचे सांगत मी ते विधान वेगळ्या अर्थाने केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
 

"कोल्हापुरात गेल्यावर्षी मी डॉल्बीच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे कोल्हापुरात डॉल्बी लागला नव्हता. त्याचा उल्लेख करताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी पाटील यांनी गणेश मंडळांचा विरोध पत्करल्यानं मंडळांमध्ये नाराजी आहे, असं कालच्या कार्यक्रमात म्हटलं होतं. त्यावर डॉल्बीला विरोध हा काही माझा पर्सनल अजेंडा नव्हता. त्या मुद्द्यावर मला काही निवडणूक लढवायची नाही. माझी काही सामाजिक भूमिका आहे, त्यामुळेच मी विरोध केला, असं मी या भाषणात बोललो. निवडणूक लढवायची नाही, हे वाक्य वेगळ्या संदर्भानं आलं होतं. मात्र त्याचा विपरीत अर्थ काढण्यात आला", असं पाटील यांनी सांगितलं. “राजकीय संन्यास घेणं हे आमच्या हातात नसतं. भाजपमध्ये वेगळी शिस्त आहे. पक्ष सांगेल तेच करावं लागतं. आम्ही निवडणूक लढवायची की नाही हे पक्षाच्या हातात असतं” असेही त्यांनी नमूद केले.

 

२००४ पासून सक्रीय राजकारणामध्ये असलेल्या चंद्रकांत पाटलांकडे अनेक महत्वाची खाती आहेत. राज्यात भाजप सकरार आल्यापासून ते कॅबिनेट मंत्री आहेत. तसेच ते सहकार, वस्त्रोद्योग, विपणन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख होते. मागील दोन वर्षांपासून त्यांच्याकडे महसूल, मदत आणि पुर्नवसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@