भेसळ रोखण्यासाठी मोहीम राबवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2018
Total Views |

अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या सूचना

 
 
जळगाव :
आगामी सण व उत्सवांच्या काळात अन्न पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषत: परराज्यातून येणार्‍या दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमाभागात अन्न व औषध विभागाने खास पथके नेमून जिल्ह्यात धडक तपासणी मोहीम राबविण्याची सूचना अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी गुरुवारी दिल्यात.
 
 
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. यावेळी त्यांनी याबाबत सूचना दिल्या. बोदवड शहरातील साफसफाई करणे, जिल्ह्यात अनेक गर्दीच्या ठिकाणी काळी, पिवळी टॅक्सीवाल्यांनी अनधिकृत थांबे सुरु केले आहे. ते अनधिकृत थांबे बंद करावेत. महाविद्यालयीन विद्यार्थिनींची रोडरोमिओकडून होणारी छळवणूक रोखण्यासाठी उपाययोजना करणे, वाहतुकीची शिस्त पाळणे यासह अनेक सूचना सदस्यांनी उपस्थित केल्यात. बैठकीच्या सुरुवातीस सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव यांनी मागील बैठकीत सदस्यांनी उपस्थित केलेल्या सूचनांवर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.
 
 
बैठकीस शासकीय सदस्य उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, पोलीस उपअधीक्षक संजय सांगळे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, सहाय्यक नियंत्रक वैधमापन शास्त्र राजेंद्र बांगर, सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव, अन्न व औषध विभाग, आरोग्य विभाग व दूरसंचार विभागाचे प्रतिनिधी, ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य रवींद्र पाटील, राहूल बोरसे, डॉ.अर्चना विशाल पाटील, पल्लवी चौधरी, ऍड.मंजुळा मुंदडा, साहित्यिक अ. फ. भालेराव, बाळकृष्ण वाणी, शिवाजीराव अहिरराव, सतीश गडे, उज्ज्वला देशपांडे, अण्णा धुमाळ, कल्पना पाटील, विकास कोटेचा, नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
 
सदस्यांनी उपस्थित केल्या सूचना
बैठकीत अशासकीय सदस्यांनी महामार्गावर अपघात झाल्यास त्वरित प्राथमिक उपचार होण्यासाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे. शेतमालाचे मोजमाप करताना शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याने मोजणी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स काटा वापरण्यात यावा. मेहरुण तलावाजवळील गैरप्रकार रोखण्यासाठी सायंकाळच्यावेळी निर्भया पथकाने याठिकाणी गस्त घालावी.
@@AUTHORINFO_V1@@