भुसावळला लाचखोर हवालदारास अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2018
Total Views |
भुसावळ, ६ सप्टेंबर :
छळ प्रकरणातील गुन्ह्यात आईला अटक न करण्यासाठी १५ हजारांची लाच मागणार्‍या बाजारपेठ पोलीस ठाण्यातील हवालदार लतीफ शेख यांना जळगाव एसीबीच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी शहरातील जाम मोहल्ला भागात रंगेहाथ अटक केली. या कारवाईने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यात विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होता. त्यातील आरोपीच्या आईला अटक करायची नसेल तर १५ हजार द्यावे लागतील, अशी मागणी आरोपी हवालदार लतीफ शेख यांनी केल्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे
 
 
तक्रार नोंदविली होती. त्यानंतर सापळा रचण्यात आला. एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नीलेश लोधी व सहकार्‍यांनी हा सापळा यशस्वी केला. रात्री उशिरा बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे तसेच आरोपीच्या घराची झडती घेण्याचे काम सुरू होते.
@@AUTHORINFO_V1@@