रेल्वे प्रवाश्याकडे सापडले १७ किलो सोने...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2018
Total Views |



 

 

मुंबई: रेल्वेतील एका प्रवाशाकडे तब्बल १७ किलो सोनं सापडलं आहे. हा प्रवासी मुंबईहून अहमदाबादकडे जाणाऱ्या सुर्यनगरी एक्स्प्रेसमध्ये प्रवास करत होता. मनीष असं या प्रवाशाचं नाव आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्याला अटक करून आरपीएफच्या ताब्यात देण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोनं घेऊन जाणाऱ्या या प्रवाशाला पकडून दिल्याबद्दल या टीसीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

आरोपी मनीष हा मुंबईहून सुरतकडे चालला होता. सूर्यनगरी एक्सप्रेसच्या एस ९ कोचमधून तो प्रवास करत होता. टीसीला मनीषच्या हालचालींवरुन संशय आल्याने त्याने रेल्वे पोलिसांना कळवलं. रेल्वे पोलिसांनी मनीषला ताब्यात घेऊन तपासणी केली असता ही बाब त्यांच्या लक्षात आली.

 

रेल्वे पोलिसानी चौकशी केली असता मनीष ने सांगितले की, त्याला हे पार्सल सुरतला पोहचवण्यास सांगितले होते. यासाठी त्याला कमिशनची मिळणार होते. विशेष म्हणजे आपल्या बॅगेत किती सोन आहे याची कल्पनाही त्याला नव्हती. पोलिसांनी सोनं जप्त केलं असून बाजारभावाप्रमाणे याची किंमत ५ कोटी १० लाख रुपये आहे. हे सोनं कोणाकडे पोहोचवण्यात येत होतं, तसंच कोणी पाठवलं होतं यासंबंधी पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@