मंत्रालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Sep-2018
Total Views |



 

मुंबई : मंत्रालय परिसरात होणारे आत्महत्यांच्या प्रयत्नांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. गुरूवारी एका महिलेने मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. दीपाली भोसले असे सदर महिलेचे नाव असून पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
 

सदर महिला ही मंत्रालयात एका प्रकरणाविषयी दाद मागण्यासाठी आली होती. यापूर्वी तिने आपल्या पतीविरधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. परंतु त्यावर कोणतीही कारवाई न केल्याने अखेर त्या महिलेने मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर अंगावरलरॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सदर महिलेला मरीन लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@