सुहास बहुलकर यांना ‘चतुरंग’चा ‘जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Sep-2018
Total Views |


 


मुंबई : महाराष्ट्रातील अग्रगण्य सांस्कृतिक संस्था चतुरंग प्रतिष्ठानतर्फे प्रतिवर्षी सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तीस देण्यात येणारा, प्रतिष्ठेचा जीवनगौरवपुरस्कार यावर्षी ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांना जाहीर करण्यात आला आहे. नुकतीच चतुरंगतर्फे याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. यावर्षी डिसेंबर महिन्यात मुंबईत होणाऱ्या चतुरंगच्या रंगसंमेलनया कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

 

१९९१ पासून चतुरंगतर्फे हा जीवनगौरवपुरस्कार देण्यात येतो. चतुरंगतर्फे नियुक्त करण्यात आलेली समाजातील मान्यवरांची निवड समिती या पुरस्कारार्थीची निवड करते. यावेळेस खा. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखालील डॉ. उदय निरगुडकर, प्रा. डॉ. कविता रेगे, दीपक घैसास, चंद्रकांत कुलकर्णी, सुधीर जोगळेकर आणि रवींद्र पाथरे आदी सदस्यांच्या निवड समितीने चतुरंगच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी चित्रकार सुहास बहुलकर यांची एकमताने निवड केली, अशी माहिती चतुरंगतर्फे देण्यात आली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार असलेले सुहास बहुलकर गेली अनेक वर्षे चित्रकलेसारख्या अभिजात, ललित कलाशाखेत आपले भरीव योगदान देत आहेत. तसेच, ‘कलावंत आणि माणूस’, ‘आयुष्याची मौल्यवान माती’, ‘बॉम्बे स्कूल, आठवणीतले, अनुभवलेलेआणि दृश्यकलेवरील ६ खंडआदी कलाविषयक पुस्तकांची निर्मिती करून भारतीय चित्रकलेच्या दस्तावेजी इतिहासातही बहुलकरांनी मोलाची भर घातली आहे.

 

मानपत्र, सन्मानचिन्ह आणि तीन लाख रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी चतुरंगचा हा जीवनगौरव पुरस्कार भालजी पेंढारकर, पु. ल. देशपांडे, सुधीर फडके, बाबासाहेब पुरंदरे, श्री. पु. भागवत, पार्वतीकुमार, भालचंद्र पेंढारकर, पं. सत्यदेव दुबे, डॉ. अशोक रानडे, रत्नाकर मतकरी, सदाशिवराव गोरक्षकर, विजया मेहता, लता मंगेशकर आदी अनेक दिग्गजांना प्रदान करण्यात आला आहे. यावर्षाखेरीस डिसेंबर महिन्यात चतुरंगचा प्रसिद्ध रंगसंमेलन सोहळाहा मुंबईतच होणार असून सदर सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार सुहास बहुलकर यांना प्रदान करण्यात येईल, असे संस्थेने स्पष्ट केले आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@