बदलापूरच्या विरेश धोत्रेची मिस्टर वर्ल्ड स्पर्धेसाठी निवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Sep-2018
Total Views |


 
बदलापूर : शरीरसौष्ठव स्पर्धेतील महाराष्ट्र श्री असलेल्या बदलापूरच्या विरेश धोत्रे यांची निवड मिस्टर वर्ल्ड आणि मिस्टर एशिया स्पर्धेसाठी झाली आहे. रायपूर येथे नुकत्याच झालेल्या निवड चाचणीमध्ये विरेश धोत्रे यांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्याची निवड करण्यात आली.
 

भारतीय संघातर्फे विरेश धोत्रे हा ऑक्टोबरमध्ये पुण्यात होणाऱ्या मिस्टर एशिया स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तर डिसेंबरमध्ये थायलंड येथे होणाऱ्या मिस्टर वर्ल्ड स्पर्धेतही धोत्रे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. विरेश धोत्रे यांनी यापूर्वी महाराष्ट्र श्री हा किताब मिळाला आहे. तसेच गेली अनेक वर्षे तो बदलापुरात आणि ठाणे जिल्ह्यात सर्व शरीरसौष्ठपटूंना मार्गदर्शन करत आहे. ऑक्‍टोबरमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी आत्तापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. विरेश चे कोच मनिष अडविलकर हे त्याला मार्गदर्शन करत आहेत. मिस्टर एशिया आणि मिस्टर वर्ल्ड स्पर्धेत भारताला पदक मिळवून देण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करत असल्याचे विरेश धोत्रे यांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@