नरेंद्र पाटीलही भाजपच्या वाटेवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Sep-2018
Total Views |

 
 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे विद्यमान आ. नरेंद्र पाटील यांनी अखेर अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी पक्ष सदस्यत्व आणि महाराष्ट्र प्रदेश लेबर सेलच्या अध्यक्षपदाचा मंगळवारी राजीनामा दिला. नुकत्याच महामंडळाच्या जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्यांमध्ये त्यांच्याकडे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली होती. त्यामुळे आता त्यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे.
 

राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान विधान परिषद आमदार आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी अखेर मंगळवारी पक्षाला रामराम ठोकला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला. पाटील हे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. त्यातच निरंजन डावखरे यांच्या भाजप प्रवेशादरम्यान पाटील त्यांना सोडण्यासाठी भाजप मुख्यालयात गेले होते. त्यावेळी निरंजन डावखरे हे आपले चांगले मित्र असल्याकारणाने त्यांना सोडण्यास गेलो असल्याचे सांगत त्यांनी वेळ मारून नेली होती. त्यातच नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या महामंडळांच्या नियुक्त्यांमध्ये त्यांच्याकडे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या भाजपमधील प्रवेशाच्या चर्चा वाढल्या होत्या. एकीकडे विकास सोडून खड्ड्यांसोबत सेल्फी काढून राजकारण करणार्या राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

 

नैतिक जबाबदारीतून राजीनामा

 

गेली अनेक वर्षे आपण मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी झटत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास ठेवत आपल्यावर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची जबाबदारी सोपवली. त्यामुळे नैतिक जबाबदारीतून राष्ट्रवादीच्या पक्ष सदस्यत्वाचा आपण राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्याला संधी दिल्यास आपण नक्कीच भाजपमध्ये प्रवेश करू.

नरेंद्र पाटील,

अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
@@AUTHORINFO_V1@@