शीळ-कल्याण सहापदरीकरणाला तातडीने सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Sep-2018
Total Views |


 

 

ठाणेः दुरुस्तीसाठी बंद असलेल्या मुंब्रा बायपासमुळे शीळ-कल्याण रस्त्यावर होत असलेल्या वाहतूककोंडीतून वाहनचालकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. शीळ-कल्याण रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाला तातडीने सुरुवात करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत एमएसआरडीसीला दिले. या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक झाली असून प्रकल्पांतर्गत पत्रीपूल येथे नव्या पुलाचे कामही करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शीळ-कल्याण रस्त्याप्रमाणेच कल्याण शहरांतर्गत वाहतूककोंडीचा प्रश्नही निकाली निघणार आहे.
 

मुंब्रा बायपास बंद असल्यामुळे वाहतुकीचा भार शीळ-कल्याण रस्त्यावर येत असल्यामुळे या रस्त्याच्या सहापदरीकरणाला त्वरित सुरुवात करण्याची मागणी जोर धरत होती. २१ किमीच्या या रस्त्याच्या कामातील १६ किमीच्या टप्प्यातील भूसंपादन पूर्ण झाले आहे. त्यामुळे त्वरित काम सुरू करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिले. त्यानुसार हे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. या बैठकीला एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

जुना ब्रिटिशकालीन पत्रीपूल धोकादायक झाल्यामुळे त्यावरील वाहतूक थांबवून तो पाडण्याची भूमिका रेल्वे प्रशासनाने घेतल्यामुळे या परिसरालाही वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. शीळ-कल्याण सहापदरीकरण प्रकल्पात पत्रीपूल येथील नव्या पुलाचाही समावेश असून त्याचेही काम तातडीने सुरू करून सहापदरीकरणाबरोबरच संपविण्याचे नियोजन आहे, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@