हार्दिक पटेलच्या आंदोलनामागे काँग्रेसचा हात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Sep-2018
Total Views |


 

 

अहमदाबाद : पाटीदार नेता हार्दिक पटेल गेल्या ११ दिवसांपासून उपोषण करत आहे. पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे ही त्याची मागणी आहे. परंतु हार्दिकच्या या आंदोलनामागे काँग्रेसचा हात असल्याचा दावा गुजरात सरकारने केला आहे. "पाटीदार आंदोलनामागे कांग्रेसचा हात आहे. ३ वर्षांपूर्वी जेव्हा हे आंदोलन सुरु झाले होते. तेव्हाच आम्हाला हा संशय आला होता. आता मात्र आमचा हा संशय खरा ठरतोय". असे वक्तव्य गुजरातचे ऊर्जामंत्री सौरभ पटेल यांनी केले.
 

"भाजपचे विरोधक, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विरोधक हे हार्दिक पटेल यांच्या निवासस्थानी जाऊन ज्याअर्थी त्याची भेट घेत आहेत. त्यावरून हे सिद्ध होते की हे आंदोलन राजकीय प्रेरीत आहे. तसेच काँग्रेसने आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी’'. असा टोला सौरभ पटेल यांनी काँग्रेसला लगावला. तसेच "५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे". असेही ते म्हणाले. त्याचबरोबर "हार्दिक पटेल यांनी आपली वैद्यकीय तपासणी करून द्यावी. डॉक्टरांना त्यांनी सहकार्य करावे. हार्दिकच्या आरोग्याची आम्हाला काळजी आहे". असे सांगून सौरभ पटेल यांनी याप्रकरणी गुजरात सरकारची भूमिका स्पष्ट केली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@