मालाडमध्ये भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2018
Total Views |


 

 

मुंबई : मालाडमधील बॉम्बे टाकीज परिसरातील इमारतीमधील एका लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ११ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 
 
 

शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ११:१५ च्या सुमारास ही आग लागली असून अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आज या परिसरात सोमवार बाजार असल्याने मोठी गर्दी असते. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून, संपूर्ण परिसर खाली करण्यात आला आहे.

@@AUTHORINFO_V1@@