भाजयुमोच्या व्हॉलेंटियर नोंदणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2018
Total Views |


 
 
अभियानाला अंबरनाथला उत्स्फूर्त प्रतिसाद
 

अंबरनाथ:- भारतीय जनता युवा मोर्चाच्या व्हाँलेंटियर नोंदणी अभियानांतर्गत अंबरनाथला १६० हून अधिक व्हाँलेंटियर्सची नोंदणी करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा कार्यकारिणी सदस्या पायल कबरे यांनी दिली आहे.रविवार २ आँगस्ट रोजी सायंकाळी ४ ते ७ यावेळेत शिवाजी चौकात युवा मोर्चाच्या माध्यमातून पायल कबरे यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी नागरिक, तरुणांशी संवाद साधून युवा मोर्चाच्या व्हालेंटियर अभियानांतर्गत सदस्य होण्याची माहिती दिली, त्यात १६० जण व्हाँलेंटियर बनले आहेत असेही पायल कबरे यांनी सांगितले.

 

या अभियानांतर्गत कोणत्याही व्यक्तीला व्हाँलेंटियर बनून आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपल्या वेळेच्या उपलब्धतेनुसार काम करता येते. पायल कबरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अभियानामध्ये शहर युवा सरचिटणीस हर्षल खारकर, सुप्रभ झा, युवराज पाटील, श्रेयश कुलकर्णी, आनंद रानडे , प्रफुल्ल पटील, विकास पाटील यांनी काम केले, तर भाजपचे प्रमोद नाटेकर, अँड. चव्हाण, प्रवीण महाजन, महिला मोर्चाच्या सरीता चौधरी, स्वप्नाली शिंदे, जान्हवी बेर्डे, यांचे मार्गदर्शन व उपस्थिती लाभली.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@