भादली रेल्वे यार्डाचे पुर्नमुद्रण10 रेल्वे गाडया रद्द तर 8 च्या मार्गात बदल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2018
Total Views |
 

 
भादली रेल्वे यार्डाचे पुर्नमुद्रण
10  रेल्वे गाडया रद्द तर 8  च्या मार्गात बदल

जळगाव, 4 सप्टेंबर
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भादली रेल्वे स्थानकावरील यार्डाचे पुर्नमुद्रण तसेच तिस-या रेल्वे लाईनचे कामा निमित्त 5 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान 10 रेल्वे गाडया रद्द तर 8 गाडयांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
 
 
गाडी क्र. 59013 सुरत- भुसावळ पॅसेंजर ही गाडी 5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर दरम्यान रद्द करण्यात आली आहे तर 59014 भुसावळ - सुरत पॅसेंजर 6 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर , 59077 सुरत-भुसावळ पॅसेंजर 5 ते 8 सप्टेंबर, 59078 भुसावळ - सुरत पॅसेंजर 6 ते 9 सप्टेंबर, 59075 सुरत- भुसावळ पॅसेंजर 5 ते 9 सप्टेंबर, 59076 भुसावळ - सुरत पॅसेंजर 6 ते 10 सप्टेंबर, 51181 देवलाली - भुसावळ पॅसेंजर 6 ते 10 सप्टेंबर, 51182 भुसावळ – देवलाली पॅसेंजर 6 ते 9 सप्टेंबर , 51153 मुंबई - भुसावळ पॅसेंजर 6 ते 10 सप्टेंबर व गाडी क्र. 51154 भुसावळ - मुंबई पॅसेंजर 6 ते 9 सप्टेंबर दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
या गाडयांचे मार्ग झाले परिवर्तीत
गाडी क्र. 11039 कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस ही गाडी 8 रोजी दौंड, अहमदनगर, मनमाड, पूर्णा , अकोला या सुधारीत मार्गावरुन धावेल , गाडी क्र. 11040 ही गाडी 9 सप्टेंबर रोजी अकोला, पुर्णा, मनमाड, अहमदनगगर, दौड या मार्गाने, 15017 लो.टि.ट. गेारखपुर काशी एक्सप्रेस 9 रोजी मनमाड, पुर्णा, अकोला, वरणगाव, दुसखेडा तर 15018 गोरखपुर - लो.टि.ट. काशी एक्सप्रेस 8 रोजी दुसखेडा, वरणगाव, अकोला, पुर्णा, मनमाड, गाडी क्र. 12833 अहमदाबाद हावडा ही 9 रोजी गोध्रा, नालदा, उज्जैन, भोपाळ, इटारसी, नागपूर तर 12834 हावडा - अहमदाबाद ही गाडी 7 रोजी नागपूर, इटारसी, भोपाळ, उज्जेन नालदा, गोध्रा मार्गे , गाडी क्र. 22129 लो.टि.ट. - अलाहाबाद एक्सप्रेस 9 रोजी मनमाड, पुर्णा ,अकोला, वरणगाव, खण्डवा आणि गाडी क्र. 12166 वाराणसी लो.टि.ट. एक्सप्रेस 8 रोजी खण्डवा, अकोला, वरणगाव, पुर्णा, मनमाड या सुधारीत मार्गो धावणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@