दिग्विजय सिंग नक्षलवाद्यांचे हितचिंतक !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2018
Total Views |



 

 

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांचे ‘गुरू’ दिग्विजय सिंह हे नक्षलवाद्यांचे हितचिंतक असल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेसने राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केल्याची टीका भारतीय जनता पक्षातर्फे मंगळवारी करण्यात आली. पुणे पोलिसांनी नुकतेच अटककेलेल्या संशयित नक्षलवाद्यांकडून मिळालेल्या एका पत्रात सरकाविरोधी कारवायांना काँग्रेस नेते आर्थिक मदत करणार असल्याचे उल्लेख आहेत. विशेष म्हणजे त्यामध्ये एक संपर्क क्रमांकदेखील दिला असून तो दिग्विजय सिंग यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून निशाणा साधत भाजपने काँग्रेसची चांगलीच कोंडी केली आहे.
 

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन दिग्विजय सिंह यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, पोलिसांनी सध्या नक्षलवादाशी संबंध असल्यावरून अनेकांना अटक केली आहे. त्यामुळे काँग्रेसने विचारांची गळचेपी होत असल्याचा आरोप लावणे सुरू केले आहे. मात्र, अटक केलेल्या व्यक्तींकडून जप्त करण्यात आलेल्या एक पत्रात अतिशय गंभीर उल्लेख सापडला आहेत. कॉ. प्रकाश याने कॉ. सुरेंद्र यास लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, काँग्रेसचे अनेक नेते आपल्याला पुढील कारवायांसाठी आर्थिक मदत करण्यात तयार आहेत. त्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्कसाधावा, ते आपले मित्र आपल्याला सर्व प्रकारची मदत करतील. असे उल्लेख करत एक मोबाईल क्रमांक दिला आहे. हा मोबाईल क्रमांक काँग्रसेचे ज्येष्ठनेते दिग्विजय सिं यांचा असल्याचे सिद्ध झाले असून सदर क्रमांक आपला असल्याचे दिग्विजय सिंग यांनीदेखील नाकारलेले नाही. त्यामुळे राजकारणासाठी काँग्रेस पक्ष थेट राष्ट्रीय सुरक्षेसाठी तडजोड करत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे पात्रा म्हणाले. काँग्रेसने नेहमीच नक्षलवादाविषयीदुटप्पी भूमिका घेतली असल्याचा आरोप करत काँग्रेसने पक्षाचे नाव बदलूनइंडियन नॅशनल काँग्रेस- माओइस्टअथवाकाँग्रेस पार्टी ऑफमाओइस्टअसे करून घ्यावे, असा टोलाही संबित पात्रा यांनी लगाविला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@