बस आणि कंटेनरची धडक, ६ प्रवासी ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2018
Total Views |


 

 

 
मनमाड : मनमाडमधील देवळा-चांदवड मार्गावरील बाभडबारी घाटात भीषण अपघात झाला आहे. नंदुरबार-नाशिक एसटी बस आणि कंटेनरची जोरदार धडक झाली असून या अपघातात ६ जण जागीच ठार झाले आहेत तर १०-१५ जण जखमी झाले आहेत. मृतांची व जखमींची अद्याप ओळख पटली नसून ओळख पटवण्याचे काम चालू आहे.
 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नंदुरबार-नाशिक ही एसटी देवळा-चांदवड मार्गावरून येत असताना समोरून येणाऱ्या कॉन्टेनेरची जोरदार धडक बसली. यात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या जोरदार धडकेमुळे एसटीमधील ६ प्रवाश्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती कळताच तेथील स्थानिक नागरिकांनी व इतर प्रवाशांनी जखमींना तात्काळ देवळा-चांदवड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@