सिडकोची नवी मुंबईमध्ये सामान्यांसाठी बंपर लॉटरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2018
Total Views |




 

 

नवी मुंबई :  सिडकोने सर्वसामान्यांसाठी नवी मुंबईमध्ये घरांची बंपर लॉटरी काढली आहे. नवी मुंबईमधील घणसोली, खारघर, तळोजा आणि द्रोणागिरी येथे हि लॉटरी काढली आहे. या घरकुल योजनेसाठी सिडकोला चांगला प्रतिसाद मिळत आहे

 
'आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (इ.डब्लू.एस) आणि लो इनकम ग्रुप (एल,आई,जी) श्रेणीतील लोकांसाठी ही घरे बांधले जातील. १४,८०० घरांपैकी ५,२६२ घरे ही इ.डब्लू.एस श्रेणीसाठी आहेत तर उर्वरित घरे ही एल.आई.जी श्रेणीसाठी आहेत.', अशी माहिती 'सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
 

१४,८०० घरांसाठी पाहिलीत १५ दिवसात ३५००० अर्ज आले आहेत. १६ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. पहिल्यांदयाच अर्ज भरण्याची सेवा ही ऑनलाईन करण्यात आली होती. अर्ज भरताना नागरिकांना काही अडचणी येत आहेत. यावरती पर्याय म्हणून टोल फ्री क्रमांक आणि सिडकोच्या संकेतस्थळावरून शंकांचं निरसन करण्यात येत असल्याची माहिती सिडकोतर्फे देण्यात आली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@