महामंडळ नियुक्त्यांनंतर भाजपप्रवेश वाढले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Sep-2018
Total Views |




 

 
राजकीय समीकरणे जुळविण्यात मुख्यमंत्री यशस्वी

मुंबई : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महामंडळांच्या रखडलेल्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे विद्यमान आ. नरेंद्र पाटील आणि वाहतूक संघटनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या महामंडळावर नियुक्त्या करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकांच्या तोंडावर राजकीय षटकार लगावला आहे.

 

काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून राज्यभरात जनआक्रोश आणि खड्ड्यांसोबत सेल्फीसारखे कार्यक्रम सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांनी महामंडळांवरील नियुक्त्या जाहीर केल्या. त्यातच विधान परिषदेत राष्ट्रवादीचा जोर कमी होत असताना राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे सोपवत राष्ट्रवादीला धक्का दिला आहे, तर अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी अराफत शेख यांची नेमणूक करण्यात आल्यानंतर त्यांनीदेखील शिवसेनेच्या वाहतूक संघटनेचे अध्यक्षपद आणि शिवसेनेचे उपनेतेपद सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाप्रती आपली नाराजीदेखील व्यक्त केली होती. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतांची जुळवाजुळव करण्यासाठी राज्य सरकारने आता महामंडळे आणि प्राधिकरणाची अध्यक्षपदे देऊन इतर पक्षातील नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्यास सुरुवात केल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. सध्याच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे. यादृष्टीने माथाडी कामगारांचे नेते आणि गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देऊन आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न आहे. यामुळे माथाडी कामगार आणि किंवा पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजातील बांधवांना आपल्याकडे वळवण्याचा हा प्रयत्न असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या १० महामंडळे आणि प्राधिकरणाच्या नियुक्त्यांवर नजर टाकली तर दुसऱ्या पक्षातून शिवसेनेत आलेल्या उपर्यांनाच आणि उपनेत्यांना पदे देण्यात आली आहेत. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी पसरली आहे. नियुक्त्यांनंतर शिवसेनेच्या अनेक पदाधिकार्यांनी नाराजी व्यक्त केल्याने आगामी काळात मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊन त्याचाही फायदा आगामी निवडणुकांमध्ये भाजपला मिळण्याची शक्यता आहे.

 
 

नाराजी दूर करण्यासाठी सामंतांची नियुक्ती

आघाडी सरकारच्या कार्यकाळात राज्यमंत्री असलेल्या उदय सामंत यांची महामंडळावर नियुक्ती न करण्याची विनंती शिवसेनेच्या काही वरिष्ठ नेत्यांनी केली होती. मात्र, नाराज सामंतांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांची महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. नवी मुंबई मनपातील शिवसेनेच्या दारूण पराभासाठी जबाबदार असलेल्या विजय नाहटा यांचीही मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळावर सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या नियुक्त्यांचा फायदा येत्या निवडणुकीत कोणाला होईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@