"...तर जशास तसे उत्तर देऊ"- पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Sep-2018
Total Views |


 

 

नवी दिल्ली: "जे आमच्या देशातील शांतता आणि प्रगती नष्ट करण्याचा प्रयत्न करतील, त्या सर्वांना आमचे जवान सडेतोड उत्तर देतील. आमच्या देशातील शांतता भंग करण्याचा जो कोणी प्रयत्न करेल त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. देशाच्या सन्मानासोबत कोणताही तडजोड केली जाणार नाही" असा इशारा यावेळी पंतप्रधान मोदींनी दिला. ते 'मन की बात' या कार्यक्रमात बोलत होते. दोन वर्षांपूर्वी २९ सप्टेंबर २०१६ला जवानांनी अतिशय गुप्त पद्धतीने सर्जिकल स्ट्राइक केला होता. त्यानिमित्ताने त्यांनी जनतेशी रेडिओद्वारे संवाद साधला. २९ सप्टेंबर हा दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा केल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये त्यांनी भारतीय जवानांच्या शौर्याला ही सलाम केला.

 

या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी नौदलाचे कमांडर अभिलाष टॉमी यांचा उल्लेख करताना त्यांच्या साहसाचे देखील कौतुक केले. याशिवाय महात्मा गांधीजींच्या १५०व्या जयंतीनिम्मित पुढील दोन वर्षात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. "गांधीजींनी आपल्या सर्वांना एक मंत्र दिला होता. तो गांधीजींचा मंत्र म्हणून ओळखला जातो.

 

समाजातील सर्व लोकांना मदत करण्याचा तो मंत्र आहे आणि आजही तो आपल्याला तितकाच लागू होतो. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही स्वरूपाची खरेदी करताना त्या वस्तूच्या निर्मितीसाठी कष्ट घेणाऱ्याच्या फायदाही पाहायला हवा." असे आवाहन पंतप्रधानांनी केले. याच बरोबर लाल बहादूर शास्त्री यांचीही जयंती साजरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय ३१ ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 'रन फॉर युनिटी'चे आयोजन केले असून यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असेही त्यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@