३६००० फुटांवर पुन्हा विमानाचा थरार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Sep-2018
Total Views |


 

 

नवी दिल्ली: विमानाच्या बिघाडाचे शुक्लकाष्ट काही संपत नाही असे दिसते आहे. हैद्राबाद विमानतळावरून निघालेले ७३७ एअरक्राफ्ट हे ३६००० फुटांवर पोहचले असता इंजिनच बंद पडल्याचे पायलटच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखून त्यांनी इंदूर विमानतळावर इमरजन्सी लँडिंग केली. यामुळे विमानात असलेल्या १०३ प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.

 

रविवारी सकाळी १०.४८ वाजता जेट एअरवेजच्या विमानाने १०३ प्रवाश्यांना घेऊन हैद्राबाद येथून उड्डाण केले होते. त्यानंतर ३६००० फूट म्हणजेच ११ किमी अंतर वर गेले असता अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यावेळी विमान ८५० किमी प्रति तास एवढी होती. तांत्रिक बिघाड झाल्याचे पायलटच्या लक्षात येताच त्यांनी इंदोर विमानतळावर तातडीने उतरवले. त्यानंतर त्यांनी विमानतळ प्राधिकरण आणि विमान कंपनीच्या तंत्रज्ञांना यांना कळवले.

 

जेट एअरवेजच्या बाबतीत ही गेल्या २ आठवड्यातली तिसरी घटना आहे. याआधी शुक्रवारी सायंकाळी मुंबईहून उड्डाण केलेल्या विमानामध्ये माजी उपमुख्यमंत्री छगऩ भुजबळ यांच्यासमवेत खासदार प्रीतम मुंडेंसह अन्य महत्वाचे पदाधिकारी, अधाकारी औरंगाबादला जात होते. यावेळी विमान अचानक खाली जाऊ लागले होते. या विमानचेही इमर्जन्सी लँडींग करण्यात आले. तसेच गेल्या आठवड्यात मुंबई- जयपूर विमानामध्ये हवेच्या दाबाचा बिघाड झाल्याने ३३ प्रवाशांच्या नाक आणि कानातून रक्त येऊ लागले होते. यामुळे त्यांना पुन्हा मुंबई विमानतळावर आणण्यात आले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@