भुसावळचे आमदार संजय सावकारे आठ दिवसांच्या विदेश दौर्‍यावरलोकसेखा समितीचे सदस्य करणार इंग्लड, नेदरलॅण्ड, फ्रान्स देशाचा दौरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2018
Total Views |
 
भुसावळचे आमदार संजय सावकारे आठ दिवसांच्या विदेश दौर्‍यावर
लोकसेखा समितीचे सदस्य करणार इंग्लड, नेदरलॅण्ड, फ्रान्स देशाचा दौरा
भुसावळ- महाराष्ट्र विधी मंडळ सचिवालय, मुंबईतील लोकलेखा समिती इंग्लड, नेदरलॅण्डसह फ्रान्स दौर्‍यावर 4 रोजी रात्री रवाना होत आहे. 14 सदस्यांच्या या समितीत भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचाही समावेश आहे. समितीतील तीनही देशातील सभागृहांची पाहणी करतील शिवाय अध्यक्षांसह सदस्यांशी चर्चा करून कामकाजाची माहिती जाणून घेणार आहेत. 4 रोजी रात्री 1.40 वाजता समितीचे सदस्य जेट एअरवेजने मुंबईहून लंडनला प्रयाण करणार तर 13 रोजी रात्री हे सदस्य भारतात परततील.
असा आहे समितीचा दौरा
बुधवार, 5 रोजी सकाळी 11 ते 1.30 दरम्यान ब्रिटीश पार्लमेंट हाऊसमधील वरीष्ठ व कनिष्ठ सभागृहातील अध्यक्षांसोबत बैठक
इंग्लडच्या लोकलेखा समितीसोबत बैठक, बंकींगहॅम्स पॅलेसला भेट, गुरूवार, 6 रोजी स्टोनहेंज व विन्स्डर कॅस्टलला भेट, शुक्रवार, 7 रोजी लंडहून ट्रेनने अ‍ॅम्सस्टरडॅमला युरो स्टारला भेट, दुपारी तीन ते साडेचार दरम्यान नेदरलॅण्ड पार्लमेंटला भेट, पार्लमेंटमधील सिनेट मेंबर्स व लोकप्रतिनिधींसोबत बैठक, शनिवार, 8 रोजी अ‍ॅम्सस्टरडॅमला भेट, रविवार, 9 रोजी अ‍ॅम्सस्टरडॅमला भेट त्यानंतर ट्रेनने पॅरीसला भेट, सोमवार, 10 रोजी 11 ते 12.30 दरम्यान फ्रान्समधील नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांसोबत तसेच सिनेट मेंबर्ससोबत बैठक व मंगळवार, 11 रोजी पॅरीसमधील प्रेक्षणीय स्थळांना भेट तसेच बुधवार, 12 रोजी सदस्यांचे शिष्टमंडळ मुंबईकडे प्रयाण करणार आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@