विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलमध्येसाकारले फुलांचे रंगीबेरंगी विश्व

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2018
Total Views |
 
 
 

विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये
साकारले फुलांचे रंगीबेरंगी विश्व

 
जळगाव, २ सप्टेंबर
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये २८ ऑगस्ट, मंगळवार रोजी पूर्व प्राथमिक विभागात ‘फुलांच्या प्रकल्पाचे’ आयोजन करण्यात आले होते. मुलं म्हणजे देवाघरची फुलं आणि या मुलांना निसर्गातील फुलांचा परिचय व्हावा, हा उपक्रम झाला.
 
 
सगळीकडे फुलांच्या सुगंधाने आणि विद्यार्थीरूपी फुलांच्या स्मित हास्याने वातावरण सुगंधीमय व प्रफुल्लित झाले होते. प्रकल्प प्रमुख मीनाक्षी बोरनारे यांनी सर्व नियोजन पाहिले. प्रज्ञा आठवले व रिना भोईटे यांनी सहकार्य केले व प्रज्ञा आठवले यांनी फुलांविषयी सुंदर गाणी सादर केली.
यशस्वितेसाठी प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील यांचे मार्गदर्शन व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
फुलांची सजावट आणि उपयोगाबाबत विवेचन
फुलांचे विविध उपयोग जसे हार, गजरे, घर सजावट, गणपती सजावट, फुलांच्या रांगोळ्या, पुष्पगुच्छ बनविणे तसेच इतर सजावटीसाठी होणारे फुलांचे उपयोग मुलांना समजावे, यासाठी प्रोजेक्टर आणि प्रत्यक्षात विविध रंगांची, प्रकारची फुले मांडून सुंदर रांगोळ्या व सजावट करण्यात आली होती. फुलांचा वापर करून अंक, अक्षर व आकारसुद्धा काढले होते. नर्सरी, ज्युनिअर व सिनिअरच्या वर्गातून एक विद्यार्थी फूल बनून आले होते. विद्यार्थ्यांनी त्या फुलांविषयी माहिती इंग्रजीमधून सांगितली. कमळ, गुलाब, लिली, जास्वंद, मोगरा, चमेली, चाफा, चंपा, झेंडू, सूर्यफूल अशा विविध प्रकारच्या फुलांचा पेहराव करून विद्यार्थी आले होते.
 
 https://www.facebook.com/Tarunbharatjal/
@@AUTHORINFO_V1@@