जनजातीतील विद्यार्थ्यांमध्ये ‘विज्ञाननिष्ठा’ रुजविण्याचा भगीरथ प्रयत्नपिंपळनेर परिसरात ‘जनकल्याण समिती’चा सेवाप्रकल्प: दुर्गम २० शाळांमध्ये विनामूल्य विविध प्रयोगांचे सादरीकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2018
Total Views |

 
जनजातीतील विद्यार्थ्यांमध्ये ‘विज्ञाननिष्ठा’ रुजविण्याचा भगीरथ प्रयत्न
पिंपळनेर परिसरात ‘जनकल्याण समिती’चा सेवाप्रकल्प: दुर्गम २० शाळांमध्ये विनामूल्य विविध प्रयोगांचे सादरीकरण
 
धुळे, २ सप्टेंबर
भारतीय बहुसंख्य समाजात श्रध्दा, अंधश्रद्धा, रुढी, परंपरा यांचे प्राबल्य आहे. विशेषत: शिक्षण व अन्य प्राथमिक आवश्यकतांपासून दूर आणि दुर्गम भागात असलेल्या जनजातीचे प्रमाण खूप आहे. राईनपाडा येथे मुलं पळवणारी टोळी समजून समाजबांधवांच्या क्रोधाने जीवाला मुकलेले ५ जण आणि तेथे अनेक दिवस असलेले वातावरण आपण सर्व जाणून आहोत.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समिती संचलित या फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेचे दप्तर जिल्हा संघ कार्यालयात असले तरी कार्यवाही होते पिंपळनेरहून.
माणूस चंद्रापाठोपाठ मंगळावर पाऊल ठेवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगत आहे आणि तंत्रज्ञानामुळे ‘जग एक खेडे’ झाल्याचे मानणारा आणि सर्व भौतिक सुखांची लयलूट करणारा तथाकथित अतिप्रगत वर्ग तयार होत आहे. मात्र दुसर्‍या बाजूला ‘ताप का येतो, पाऊस कमी आणि तापमान जास्त का?...’ याचा विचारही करता न येणारे जनजातीतील लक्षावधी समाजबांधव आपल्या आसपास आहेत. त्यांच्या पुढल्या पिढीला तरी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे, त्यांच्यात विज्ञाननिष्ठा रुजवावी , या उदात्त व दूरगामी हेतूने रा.स्व.संघाच्या जनकल्याण समितीने नियोजनपूर्वक राज्यभरातील जनजातीबहुल क्षेत्रात निवडक ठिकाणी अशा फिरत्या प्रयोगशाळा सुरु केल्या आहेत.
 
गेल्या जानेवारीत नाशिकला झालेल्या ७ दिवसीय जिल्हास्तर प्रशिक्षण वर्गात ‘अज्ञानातून विज्ञानाकडे’ या विषयावर विचाराअंती या प्रकल्पाची आखणी झाली. या प्रकल्पाच्या कार्यवाहिकरीता धुळ्याकरिता गठित ४ सदस्यीय समितीत शिक्षक छगन देशमुख आणि विनोद कुंवर, शिक्षण आयाम प्रकल्प प्रमुख ऍड.कुणाल पाटील, सहप्रमुख दिनेश सैंदाणे आहेत.
खासगी शाळेतील अनुभवी शिक्षक छगन बुधाजी देशमुख (वय ३६, रा. हनुमंतपाडा, राईनपाडालगतचे गाव) हे संघाचे स्वयंसेवक. ते मानधन तत्त्वावर ही जबाबदारी सांभाळत आहेत. प्रयोगासाठी दुचाकी वाहन, प्रयोग साहित्यासाठी पेटी आणि प्रयोगकर्त्याची  दर्‍याखोर्‍यातील भ्रमंती पाहता त्याला ‘अपघात विमा कवच’ देण्यात आले आहे. १३ ऑगस्ट १८ ला या सेवाप्रकल्पाचा शुभारंभ प्रांत निमंत्रक श्रीरंग पिंपळीकर (रा.डोंबिवली) यांच्या हस्ते झाला.
 
 
प्रांताच्या निकषानुसार २० कि.मी. परिघातील जि.प. आणि शासकीय आश्रम शाळा, त्यातील शिक्षक आणि ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्याचे २ दिवस ४ वेळा सर्वेक्षण करण्यात आले. (अर्थात आदिवासी प्रकल्प अधिकारी यांच्या अनुमतीने) जि.प.ची १ शाळा आणि जनजातीच्या विद्यार्थ्यांच्या १९ आश्रमशाळा त्यात समाविष्ट आहेत.
 
 
अभ्यासाला विज्ञान विषय पण आवश्यक ते साहित्य पुरेशा प्रमाणात अनेक आश्रमशाळांमध्ये नाही...
गेल्या काही दिवसात १६ शाळांमध्ये हवेचा दाब हा प्रयोग करण्यात आला. भविष्यात पाण्याचे शुद्धीकरण, उष्णतेमुळे स्थायी पदार्थाचे प्रसरण आणि आकुंचन अभ्यासने, माती परीक्षण, अभिसरण, अन्न भेसळ ओळखणे इ. प्रयोग देशमुख आणि सहकारी सादर करतील. मदतीला असतील जिज्ञासू विद्यार्थी.
 
 
पालक व विद्यार्थी वर्गाची बिकट आर्थिक स्थिती आणि त्यांच्या अभावग्रस्त जीवनाचा विचार करता पुढची पिढी तरी आचारविचाराने उन्नत, डोळस व्हावी, यासाठी तरी शहरी, निमशहरी क्षेत्रातील शिक्षणप्रेमी, संवेदनशील वर्गाने निश्‍चित स्वरुपात अधूनमधून यथाशक्ती मदत करायला हवी, असे वाटते.
 
 
खासगी शाळांचा ‘हट्ट’ या प्रयोगांची माहिती खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांच्या व्हॉटस् ऍपवर झळकताच अनेक खासगी शाळा संस्था चालकांनी, शिक्षकांनी आमच्या शाळेतही ही फिरती प्रयोग शाळा आणि प्रयोग व्हायला हवेत, अशी हट्टात्मक अपेक्षा व विचारणा केली आहे, हे सुखद सुचिन्हच!...खरे तर या शाळांच्या व्यवस्थापनाने स्वखर्चाने असेच प्रयोग केले तर ते स्वागतार्हच ठरतील.
 
 
प्रबोधनपर गीत, संस्कारक्षम कथांचीही मदत
विज्ञानाच्या तासिका वेळात-४५ मिनिटात प्रयोग सादर करताना प्रबोधनपर गीत, संस्कारक्षम कथा निवेदन करण्यात आले. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या बोलीभाषेत माहिती आणि प्रश्‍नोत्तरे झाली. साहजिकच जिज्ञासा निर्माण करीत सोप्या व स्वभाषेत विवेचन...याचा एकूणच परिणाम छान होत प्रतिसाद उत्तम मिळत आहे. सहली, मेळावे, विज्ञान शिबिरे, पालक भेट व संवाद याचेही आयोजन पुढे असणार आहे.
 
 https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 
@@AUTHORINFO_V1@@