३०० वर्षापूर्वीची पारंपारिक 'देवाची हंडी'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2018
Total Views |



पनवेल : ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या परंपरा लांभलेल्या पनवेल तालुक्यात सुमारे ३०० वर्षांपासून दहीहंडी हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. या हंडीला 'देवाची हंडी' असेही म्हणतात. गोकुळाष्टमीच्या दिवशी तिकडे असलेल्या ऐतिहासिक बापट वाड्यातील देव-देवताच्या मूर्तीचा अभिषेक करून त्याची सजावट केली जाते. साधारणतः १७३० म्हणजेच अगदी पेशव्याची राजवट असल्यापासून हा सण मोठ्या दिमाखात आजही चालू आहे. या दिवशी रात्रभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यामध्ये पारायणे, भजन, कीर्तन असे कार्यक्रम होतात.

 

या दहीहंडीचे वैशिष्ट म्हणजे अलीकडे आठ-नऊ थर लावून जशी दहीहंडी फोडतात तसे न करता एका ठराविक उंचीवर दहीहंडी बांधून सर्व जण एक रिंगण करतात. नावीन्य म्हणजे सगळे गोलाकार रिंगण करून उभे राहिल्यानंतर तिथे जमलेल्या सर्व गोविदांना एका जाड्या दोरखंडाचे फटके मारले जातात. नंतर ती दहीहंडी एका काठीच्या साहाय्याने फोडली जाते. अशी परंपरा बऱ्याच वर्षांपासून पिढ्यानपिढ्या अगदी जशी च्या तशी चालू आहे. अशी पारंपरिक व नाविन्यपूर्ण दहीहंडी बघण्यासाठी दरवर्षी अनेकजण मोठी गर्दी करतात.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@