मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जयजवान गोविंदा पथकाची ९ थर रचून सलामी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2018
Total Views |


 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

ठाणे - ठाण्यातील हिरानंदानी मेडोज येथे स्वामी प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहिहंडी उत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी उपस्थिती दर्शवत गोविंदा पथकांचे कौतुक केले. यावेळी जयजवान गोविंदा पथकाने ९ थर मानवी मनोरा रचत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सलामी दिली.आपल्या छोट्याशा संदेशात ते म्हणाले की, प्रभू श्रीकृष्णाचा आशीर्वाद घेऊन तुम्ही दहीकाल्याची ही हंडी फोडा, आम्ही अत्याचार, भ्रष्टाचाराची हंडी फोडूत. थरांवर थर लावणाऱ्या पथकांचे देखील त्यांनी कौतुक केले. मुख्यमंत्र्यांच्या आगमनानंतर जय जवानच्या पथकाने ९ थर लावून मुख्यमंत्र्यांना सलामी दिली तेव्हा वातावरणात जोश पसरला.

स्वामी प्रतिष्ठानचे तसेच भारतीय जनता माथाडी, जनरल कामगार संघ, महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी हिरानंदानी मेडोज येथे प्रथमच दहिहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहिहंडी असलेल्या स्वामी प्रतिष्ठानच्या दहिहंडी उत्सवात १० थरांसाठी २५ लाखांचे पारितोषिक आहे. तर एकूण ५० लाखांची पारितोषिके वितरीत केली जाणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी 3च्या सुमारास दहिहंडी उत्सावाला भेट देऊन गोविंदा पथकातील गोविंदांना प्रोत्साहन दिले. यावेळी स्वामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी पाटील तसेच प्रतिष्ठानने दत्तक घेतलेल्या आदिवासी मुलींनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. विद्या पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे औक्षण केले.

 

यावेळी केरळ पुरग्रस्तांसाठी ५ लाख तर महाराष्ट्रातील आत्महत्यग्रस्त शेतकरी मुलांसाठी २ लाखांचा धनादेश मुख्यमंत्री निधीसाठी देण्यात आला. यावेळी खासदार कपिल पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, आमदार गणपत गायकवाड, आमदार प्रसाद लाड, आमदार रमेश पाटील, भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले, भाजप प्रवक्ता शायना एन.सी., माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, नगरसेवक कृष्णा पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, अमोल मंडलिक, सुभाष आंबेकर आणि भाजपाचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

 
@@AUTHORINFO_V1@@