श्री कृष्ण मंदिरातील चोरांचा लागला छडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2018
Total Views |




 


ठाणे: जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण मंदिरात चोरी करणाऱ्या सहा चोरट्यांना पोलिसांनी अवघ्या ८ तासांत पकडले. त्यांना मुद्देमालासह पकडण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाच्या मदतीने पोलिसांनी या चोरीचा छडा लावला.

 

या सहा चोरांनी मंदिरातले १०० वर्षांहून अधिक जुने असलेले ९०० ग्रॅम सोन्याचे दागिने, २० किलो चांदीची भांडी चोरली होती. जवळजवळ ३५ लाखांचा मुद्देमाल यांनी पळवला होता. शिवाय, मंदिराचा मागील दरवाजा तोडण्यात आला होता व सीसीटीव्हीमध्ये छेडछाड करण्यात आली होती. मंदिरातील प्रशासनाच्या हि बाब लक्षात आल्यावर त्यांनी त्वरित पोलिसाना कळवले होते.

 

अवघ्या काही तासांमध्ये ठाणे पोलिसांनी या सहा चोरांना अटक केली. त्यांच्यावर आय.पी.सी.चे ४५४, ४५७ आणि ३८० हे कलम लावण्यात आली आहे. संतोष कांबळे, अरुण सोनकर, रेखा संतोष कांबळे, झुल्फिकार मन्सूर, आझाद शाह आणि शेहझाद खान अशी या आरोपींची नावे आहेत.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@