विज्ञान खेळणी महोत्सव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2018
Total Views |


 

मुंबई : मराठी विज्ञान परिषद आणि लोकमान्य सेवा संघ, विलेपार्ले यांच्या संयुक्त विद्यमानेविज्ञान खेळणी महोत्सवदि. सप्टेंबर रोजी विलेपार्ल्यात संपन्न झाला. सुमारे २०० विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेत प्रकाश, चुंबक, गुरूत्वमध्य इत्यादी विषयांवरील खेळणी स्वत: तयार करण्याचा आनंद तर लुटलाच, पण काही तयार खेळणी त्यांना दाखवण्यात आली आणि त्यामागचे वैज्ञानिक तत्त्वही समजावून सांगणयात आले. त्याचप्रमाणे या महोत्सवात विद्यार्थ्यांना कागदी पिशवी बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्यामुळे त्यांनी तयार केलेल्या कागदी पिशव्यांतून खेळणी नेता आली हे विशेष. मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यकर्त्यांसह साठ्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही अत्यंत उत्साहाने शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महोत्सवादरमान्य विज्ञानविषयक पुस्तकांचे प्रदर्शन लावले होते, त्याचा लाभही विद्यार्थ्यांसह पालकांनी घेतला.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@