नक्षलवाद्यांकडून दोन आदिवासींची निर्घृण हत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2018
Total Views |


नक्षल्यांचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा उघड

गडचिरोली : आदिवासींच्या हक्काची लढाई लढण्याच्या बाता करणार्‍या नक्षलवाद्यांचा खरा क्रूर चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. नक्षलग्रस्त जिल्हा गडचिरोली व छत्तीसगढच्या सीमावर्ती भागामध्ये रविवारी मध्यरात्री सशस्त्र नक्षल्यांनी दोन आदिवासींची गळा चिरून निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. यामुळे पुन्हा एकदा स्थानिक आदिवासी जनतेमध्ये गेले दोन दिवस भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

रविवार, दि. २ सप्टेंबर रोजी मध्यरात्री छत्तीसगढमधील रहिवासी असलेल्या सोनू पदा (३५) आणि सोमजी पदा (४०) या दोन इसमांची धारदार शस्त्राने गळा कापून हत्या करण्यात आली. गट्टा जांभिया (ता. एटापल्ली) या छत्तीसगढ राज्याच्या सीमेला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील गावाजवळ ही घटना घडली. पोलीस व स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गट्टा जांभिया पोलीस स्थानकापासून १ किमी अंतरावर असलेल्या ताडगुडा मार्गावर या दोघांचे मृतदेह आढळले. सुमारे २० ते २५ नक्षलवादी शनिवारी रात्री सोनू पदा व सोमजी पदा यांच्या बांदे उलिया (छत्तीसगढ) गावी गेले. त्यांना नक्षलवाद्यांनी झोपेतून उठवून बाहेर नेले व त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांची धारधार शस्त्राने गळा कापून हत्या केली. नक्षल्यांनी दोघांचेही मृतदेह गट्टा उपपोलीस ठाण्यापासून उत्तरेस १ किमी अंतरावर असलेल्या ताडगुडा मार्गावर फेकून दिले. हत्या करण्यात आलेले हे दोन्ही इसम आदिवासी समाजातील असून पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून त्यांची हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, आदिवासींच्या हक्कासाठी आमची लढाई आहे, असे सांगणारे नक्षलवादी आदिवासी भागात जनतेशी कसे वागतात आणि आदिवासी जनता त्यांच्यामुळे किती भयग्रस्त आहे, हेच यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@