जळगावातील उद्योगांच्या विकासासाठी दर महिन्याला मुंबईत बैठकपालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे तत्पर अभिवचन,जळगाव ‘तरुण भारत’तर्फे आयोजित ‘थेट संवाद’ कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2018
Total Views |
 
 
 
 

जळगावातील उद्योगांच्या विकासासाठी दर महिन्याला मुंबईत बैठक

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे  तत्पर अभिवचन,
जळगाव ‘तरुण भारत’तर्फे आयोजित ‘थेट संवाद’ कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
 

जळगाव, २ सप्टेंबर
जळगाव एमआयडीसीमधील उद्योगांचा विकास साधताना उद्योजकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी दर महिन्याला एक दिवस उद्योजकांसमवेत मुंबई येथे बैठक घेण्याचे अभिवचन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. ते रविवारी हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे ‘तरुण भारत’तर्फे आयोजित ‘तरुण उद्योजकांशी थेट संवाद’ या कार्यक्रमात बोलत होते.
 
 
मंचावर खा. ए. टी. नाना पाटील, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष हेमंत देशमुख, माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र लढ्ढा, निवासी संपादक दिनेश दगडकर उपस्थित होते.
उद्योजकांनी वीजदर, जीएसटीचे स्लॅब, प्लास्टिक बंदीचे उद्योगांवरील परिणाम, सौर ऊर्जा, शासकीय योजनांसाठी एक खिडकी योजना, नवीन एमआयडीसी आदी विविध मुद्यांवर आपल्या सूचना व अडचणी मांडल्या. या अडचणी सोडवायच्या असतील, तर शासनाकडून सहकार्य मिळायला हवे, अशी मागणीवजा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. त्यावर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जळगाव एमआयडीसीमधील उद्योगांचा विकास आणि त्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी दर महिन्यात एक दिवस उद्योजकांसमवेत मुंबई येथे बैठक घेण्याचे अभिवचन दिले. ते पुढे म्हणाले की, उद्योजकांचे प्रश्‍न विविध विभागांशी संबंधित असतात. मुंबई येथील बैठकीमुळे या विभागांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी लागलीच संपर्क साधणे शक्य होईल.पश्‍चिम महाराष्ट्रात सहकार चळवळीमुळे अनेक साखर कारखाने उभे राहिले. याशिवाय अनेक खासगी उद्योगही आहेत. यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होण्यास मदत झाली आहे.
उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कार्यक्रमास उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हॉटेलच्या मध्यवर्ती सभागृहात टेबल्स् आणि त्या सभोवतीने खुर्च्या (राऊंड टेबल) अशी दिमाखदार आसनव्यवस्था होती. प्रत्येक टेबलवर रायटिंग पॅड, पेन, चॉकलेट, पाण्याच्या बॉटल्स् व अभिप्राय नोट ठेवण्यात आली होती. संपूर्ण सभागृह उपस्थितांनी खच्चून भरले होते. अनेकांनी शेवटपर्यंत उभे राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला. मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यानंतर दुसर्‍या क्रमांकाचे स्थान असलेल्या चंद्रकांतदादांनी अगदी सहजपणे सर्वांमध्ये मिसळत सकारात्मक संवाद साधला, त्याचे अनेकांना अप्रूप वाटले. कार्यक्रमानंतर हॉटेलच्या लॉनवर सर्वांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था होती.
 
त्यामुळे मराठवाडा आणि खान्देश यांच्या तुलनेत येथे बेरोजगारीचे प्रमाण कमी आहे. उद्योग वाढत नाहीत तोपर्यंत रोजगारही निर्माण होत नाहीत, हे सूत्र लक्षात घेऊन जळगावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन सामूहिकरीत्या प्रयत्न करूया, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. त्यांनी उद्योजकांच्या विविध समस्यांवर दिलासा देणारे काही पर्यायही लगेचच सुचविले. या पर्यायांचे आणि चंद्रकांतदादांनी लागलीच निर्णय घेण्याच्या स्वभावाचे उद्योजकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र लढ्ढा यांनी प्रास्ताविक, सचिव स्वप्निल चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. संचालक राजीव बियाणी यांनी आभार मानले. 
'' थेट संवाद '' आयोजनात लघू उद्योग भारती , जळगाव एम.आय.डी.सी युनिटचे विशेष सहकार्य राहिले.
 
 
https://www.facebook.com/Tarunbharatjal/ 
@@AUTHORINFO_V1@@