नाट्यगृह वापरासाठी खुले करा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2018
Total Views |
 
 

नाट्यगृह वापरासाठी खुले करा  
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

 
जळगाव, २ सप्टेंबरः
अद्ययावत सोयीयुक्त बांधण्यात आलेले नाट्यगृह त्वरित वापरासाठी खुले करण्यात यावे. त्याचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते भविष्यात करण्यात येईल, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा यांनी दिले.
 
 
जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्ह्यात विविध विकासकामांसाठी देण्यात आलेल्या निधीचा वापर संबंधित विभागांनी लोककल्याणकारी योजनांसाठी खर्च करावा. शासनाच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी अधिकार्‍यांनी मिशनमोडवर काम करण्याचे निर्देश त्यांनी रविवारी दिले.
 
 
जिल्हा नियोजन समितीच्या खर्चाचा आढावा अजिंठा शासकीय विश्रामगृहात घेतला. यावेळी पालकमंत्र्यांनी २०१७-१८मध्ये विविध विभागांना योजना राबविण्यासाठी मिळालेल्या निधीतून विभागांनी राबविलेल्या विविध योजनांचा तसेच २०१८-१९ साठी मिळालेल्या निधीपैकी आतापर्यंत झालेल्या खर्चाचा आढावा घेतला.
 
 
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, उपवनसंरक्षक दिगंबर पगार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश वाघ, आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष ठाकूर यांच्यासह विविध विभागांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
 
 
जिल्ह्याला २०१७-१८ मध्ये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी २८६ कोटी निधी मिळाला होता. जलयुक्त शिवार योजनासाठी ६४ कोटी, आदिवासी उपयोजनेसाठी २६ कोटी, आदिवासी उपयोजना (बाह्यक्षेत्र) ४९ कोटी तर अनुसूचित जाती जमाती उपयोजनेसाठी ८९ कोटी असा एकूण ५१५ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. हा सर्व निधी खर्च झाल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी बैठकीत दिली. तर सन २०१८-१९ या वर्षासाठी सर्वसाधारण योजनेसाठी ३०१ कोटी ७८ लाख, आदिवासी उपयोजनेसाठी ३० कोटी ८१ लाख कोटी, आदिवासी उपयोजना (बाह्यक्षेत्र) ५२ कोटी १२ लाख तर अनुसूचित जाती जमाती उपयोजनेसाठी ८९ कोटी असा एकूण ४७३ कोटी ७९ लाख रुपयांचा नियमव्यय मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ४१६ कोटी ८१ लाख रुपयांची तरतूद प्राप्त झाली असून १२५ कोटी ५१ लाख रुपयांचे वितरित करण्यात आले आहे. त्यापैकी ऑगस्टपर्यंत ६० कोटी ५६ लाख रुपये खर्च झाल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश वाघ यांनी दिली.
 
 
अधिकार्‍यांनी मिशन मोडवर काम करा
सर्व अधिकार्‍यांनी नियोजन विभागाकडून प्राप्त झालेला निधी वेळेत पूर्ण खर्च करावा, मार्च महिन्यापर्यंत खर्च करण्यासाठी थांबता कामा नये, मिळालेल्या निधीतून जनतेच्या कल्याणाचे चांगले कामे झाली पाहिजेत. यातून जनतेला समाधान मिळाले पाहिजे यासाठी अधिकार्‍यांनी मिशन मोडवर काम करावे, असेही ते म्हणाले. शहरातील समांतर रस्त्यांची निविदा काढण्याचे काम येत्या १५ दिवसांत पूर्ण करण्यात येणार असून शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाची निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचेही पालकमंत्री चंद्रकांतदादा यांनी सांगितले.
 
समांतर रस्त्यांच्या निविदा काढण्याचे काम
येत्या १५ दिवसांत पूर्ण करा
शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाच्या
निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात
जिल्हा नियोजन समितीमार्फत वाटप करण्यात
आलेल्या निधीच्या खर्चाचा पालकमंत्र्यांनी
घेतला आढावा
नियोजन समितीच्या माध्यमातून मिळणार्‍या
निधीचा वापर लोककल्याणकारी योजनांसाठी वापरा
 
https://www.facebook.com/Tarunbharatjal/ 
@@AUTHORINFO_V1@@