पोस्ट पेमेंट्स बँकेविषयी सर्वकाही एका क्लिकवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2018
Total Views |


 

 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे उद्घाटन करण्यात आले असून, मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेपैकी ही एक योजना आहे. या बँकेचे महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे या बँकेत एका मिनिटापेक्षा कमी वेळात खात उघडलं जाणार आहे. म्हणूनच आज इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेविषयी माहिती जाणून घेऊयात...

 

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेविषयी माहिती

 
> इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही सामान्य बँकेसारखीच असून यामध्ये बचत/चालू खाते ओपन करता येईल.
 

> पोस्ट बँकेत खाते काढण्यासाठी ग्राहकांचे किमान वय १८ वर्ष पूर्ण असले पाहिजे.

 

> या बॅंकेतील बचत खात्यातील ठेवींवर जवळपास चार टक्के व्याजदर मिळणार आहे.

 

> एका वर्षाच्या आत खातेधारकांना केवायसी पूर्ण करता येणार.

 

> ग्रामीण भागात ज्या ठिकाणी बँक नाहीत त्या ठिकाणी टपाल खात्याच्या मदतीने बॅंकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

> मनी ट्रान्सफर, सरकारी योजनांवरील अनुदान थेट खात्यात जमा होणं, बिल पेमेंट इत्यादी सुविधा या बँकेतून मिळतील.

 

> मोबाईल आणि बायोमेट्रिक उपकरणाच्या मदतीने बँकेची सुविधा दिली जाणार आहे.

 

> बँकेच्या सर्व सुविधा मायक्रो ATM, मोबाइल बॅंक अप्लिकेशन, SMS आणि IVRS द्वारे वापरता येऊ शकतील.

 

> या बॅंकेत एक लाख रुपयांहून अधिक रक्कम ठेवता येणार नाही. १ लाखांपेक्षा जास्त रक्कम असणारे खाते पोस्ट ऑफिस बचत खात्यामध्ये ट्रान्स्फर केले जातील.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@