जळगावच्या उद्योजकांच्या प्रश्‍नांसाठीस्वतंत्र ओएसडी नेमणार : पालकमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2018
Total Views |

 

जळगावच्या उद्योजकांच्या प्रश्‍नांसाठी
स्वतंत्र ओएसडी नेमणार : पालकमंत्री

 
जळगाव, २ सप्टेंबर
जळगावमधील उद्योगांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी स्वतंत्र ओएसडी नेमणार असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी उद्योजकांना दिलासा दिला. ते रविवारी हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे ‘तरुण भारत’तर्फे आयोजित ‘तरुण उद्योजकांशी थेट संवाद’ या कार्यक्रमात बोलत होते.
 
 
चंद्रकांतदादांनी उद्योगांच्या विकासासाठी एक अभिनव संकल्पनाही मांडली. उद्योजकांनी एकत्र येऊन उद्योगांच्या विकासासाठी, तसेच आजारी उद्योगांना मदतीसाठी स्वतंत्र निधी जमा करावा. उद्योजकांच्याच समितीने या निधीचे व्यवस्थापन करावे. त्यात बाहेरील व्यक्तींनीही आपला वाटा द्यावा म्हणून त्यांना सरकार विनंती करेल. वित्तपुरवठ्याच्या या अनौपचारिक रचनेमुळे आजारी उद्योग वाचण्यास मदत होईल. यावर उद्योजकांनी विचार करावा, असे आवाहन केले.
पालकमंत्र्यांनी कार्यक्रमानंतर उद्योजक संघटना, तसेच उद्योजक यांच्याशी संवाद साधला. वेळेअभावी जे प्रश्‍न मांडले गेले नाहीत, त्यांनी ते लिखित स्वरुपात कार्यक्रमस्थळी ड्रॉप बॉक्समध्ये टाकावेत, अशी सूचनाही केली.
 
 
या कार्यक्रमाच्या निमित्ताने जळगाव ‘तरुण भारत’ने उद्योजकांना एकत्र आणल्याचे कौतुक केले. उद्योग आणि उद्योजकांचे प्रश्‍न मांडण्यात आता ‘तरुण भारत’नेही पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
https://www.facebook.com/Tarunbharatjal/ 
 
 
@@AUTHORINFO_V1@@