नेत्रचेतना यात्राः चाळीसगावकरांनी घेतला ‘अंधानुभव’मांगीलालजी बाफना नेत्रपेढीच्या वतीने ‘अंधानुभव देणारी नेत्रचेतना यात्रे’चे आयोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2018
Total Views |
 
नेत्रचेतना यात्राः चाळीसगावकरांनी घेतला ‘अंधानुभव’
मांगीलालजी बाफना नेत्रपेढीच्या वतीने ‘अंधानुभव देणारी नेत्रचेतना यात्रे’चे आयोजन
 
 
जळगाव, २ सप्टेंबर
जिल्ह्यात २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान ३३ वा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नेत्रपेढीतर्फे चाळीसगावात नेत्रदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
 
 
नेत्रचेतना यात्रेला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला. राष्ट्रीय कन्या शाळेपासून सुरुवात झाली. यात्रेची स्टेशन रोडमार्गे आ.बं.हायस्कूलच्या प्रांगणात यात्रेची सांगता झाली.
 
 
त्यात हरिभाऊ चव्हाण निवासी विद्यालयातील अंध विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शहरातील १७ सामाजिक संघटनांचा सहभाग होता. मांगीलालजी बाफना नेत्रपेढीचे प्रमुख सचिन चोरडिया, कार्यक्रम प्रमुख तुषार तोतला, संचालक विनोद पाटील, अनुया कक्कड, व्यवस्थापक भानुदास येवलेकर, जनसंपर्क अधिकारी कृणाल महाजन, समाधान चौधरी उपस्थित होते.
 
 
नेत्रचेतना यात्रा केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित मांगीलालजी बाफना नेत्रपेढीच्या सहकार्याने झाली. नेत्रदान केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. यात २००१ मध्ये कृष्णा पाटील यांनी तर २००३ मध्ये गोवर्धन पाटील यांनी मरणोत्तर नेत्रदान केले होते. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
नेत्रदानासाठी वयोमर्यादेची अट नाही, मृत्यूनंतर चार तासांत नेत्रदान करणे आवश्यक आहे, असे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद पाठक यांनी सांगितले. राजेंद्र छाजेड, आ.उन्मेश पाटील, सचिन चोरडीया, मीनाक्षी निकम यांनी समयोचित विचार मांडले. प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार कैलास देवरे, चाळीसगाव एज्युकेशन संस्थेचे सचिव डॉ.विनोद कोतकर, लक्ष्मीकांत पाठक, भारती चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
अनेक संस्थांचा सहभाग
स्वयंदीप फाउंडेशन, युगंधरा फाउंडेशन, जिजाऊ समिती, रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटी, गुरुकुल ट्रस्ट व ग्रंथालय भारती (देवगिरी प्रांत), आई फाउंडेशन, उमंग महिला शिल्पी, रंगगंध कलासक्त न्यास, भारत विकास परिषद, चाळीसगाव तालुका मेडिसिन डीलर असोसिएशन, आय.एम.ए, इनरव्हील क्लब, रोटरॅक्ट क्लब, रोटरी क्लब ऑफ संगम, रोटरी क्लब ऑफ मिलेनियम, मारवाडी युवा मंच, संस्कार भारती, महाराष्ट्र वाणी युवा मंच इत्यादी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
 https://www.facebook.com/Tarunbharatjal/
@@AUTHORINFO_V1@@