बससेवा कुचकामी, ग्रामीण विद्यार्थी हतबल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2018
Total Views |
 
 
 
बससेवा कुचकामी, ग्रामीण विद्यार्थी हतबल
 
तभा वृत्तसेवा
जळगाव, २ सप्टेंबर
बस फेर्‍यांच्या नियोजनाअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार शनिवारी रवंजा येथील विद्यार्थ्यांनी जळगाव बसस्थानकाचे व्यवस्थापक बोरसे यांच्याकडे केली. सकाळची वेळ असल्याने विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल तसेच लेक्चरचे नुकसान होत असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यवस्थापक यांना बोलून दाखवली. विद्यापीठातील विद्यार्थी, आयटीआय तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
 
 
जळगाव बसस्थानकातून रवंजा जाणार्‍या बसेस ह्या वेळेवर सुटत नाही. बसेस ह्या निकृष्ट दर्जाच्या असतात. लागणार्‍या गाड्यांमध्ये धड बसण्याची आसन व्यवस्थित नसते. सगळ्यात जास्त उत्पन्न हे या मार्गावरून मिळते. तरी प्रवासी, विद्यार्थ्यांना चांगल्या बसेस मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या मार्गावरून सकाळी शहरातील महाविद्यालयात दीडशे ते दोनशेहून अधिक विद्यार्थी अप-डाऊन करतात. रोज सकाळी येणार्‍या बसेस ह्या गर्दीने भरलेल्या असतात. तसेच तिकडून येणार्‍या बसेस ह्या विद्यापीठ गेटला थांबा असूनही गाडी थांबत नसल्याची तक्रार विद्यापीठातील समाजकार्य विभागातील विद्यार्थिनींनी ‘तरुण भारत’ला दिली. याविषयी अनेकवेळा विद्यार्थी तसेच नोकरदार यांनी नीलिमा बागुल यांना भेटून तक्रार केली. पण त्या नेहमी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची तक्रार त्यांनी बोरसे यांच्याजवळ केली. दोन वेळेस जळगाव आगार व्यवस्थापक राजेंद्र देवरे यांना पण भेटायला आल्यावर ते भेटले नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
मुक्कामी बस बंद करण्याची धमकी
बसफेर्‍या वाढवण्यासाठी पाच ते सहा वेळेस निवेदन देऊनही बस फेर्‍या वाढवण्यात आल्या नाहीत.त्यामुळे खडकी येथील विद्यार्थी हे तीन किलोमीटर पायी येऊन खर्ची फाट्यावर थांबावे लागते. ही तक्रार घेऊन काही विद्यार्थी नीलिमा बागुल यांच्याकडे गेल्यावर जी मुक्कामी बस जाते, ती पण बंद करण्याची धमकी मिळत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
 
https://www.facebook.com/Tarunbharatjal/
 
@@AUTHORINFO_V1@@