कायद्याचे बोला...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2018
Total Views |



 

एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीला मदत करणे, तिला संकटातून बाहेर काढणे, असे जर सर्व स्त्रियांनी ठरवले, तर स्त्रियांचे कित्येक प्रश्न त्या आपापसातच सोडवू शकतील.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

समाजात अलीकडे घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. पती-पत्नींपैकी एकहीजण माघार घ्यायला किंवा तडजोड करायला तयार होत नाही. दरवर्षी न्यायालयात घटस्फोटाच्या खटल्यांची भर पडतच असते. अशी प्रकरणे अनेक वकील हाताळतात. परंतु घटस्फोटाचा खटला लढण्यापूर्वी त्या दाम्पत्याचा घटस्फोट होऊ नये म्हणून प्रयत्न करणारे वकील हे अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच सापडतात. अॅ. सुजाता लाड हे यातीलच एक नाव! १९९४ पासून सुजाता या त्यांच्याकडे घटस्फोटासाठी येणाऱ्या जोडप्यांना समुपदेशन करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे हजारो संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचले आहेतसुजाता घटस्फोटासाठी येणाऱ्या जोडप्यांच्या एकमेकांबद्दलच्या तक्रारी प्रथम ऐकून घेतात. त्यानंतर त्या दोघांनाही त्यांच्या वागण्यात किंचितसा बदल करण्याचे सुचवतात, त्यांना मुलांचा विचार करायला सांगतात व जगण्यासाठी एक सकारात्मक दृष्टिकोन देतात. त्यांच्या याच प्रयत्नांनी आज अनेक नाती फुलली आहेत. आजवर कुटुंब न्यायालयात सुजाता यांनी अनेक खटले हाताळले आहेत. अनेकांना न्याय मिळवून दिला आहे.

 

अनेक स्त्रिया या केवळ संसार टिकावा म्हणून अनेक वर्ष पतीची मारहाण सहन करत असतात. आपले मानवी हक्कदेखील त्या विसरलेल्या असतात. अशा अनेक स्त्रियांना योग्य मार्ग दाखवण्याचे काम सुजाता यांनी केले आहे. काही स्त्रिया तर केवळ वकिलाचे शुल्क भरण्याची ऐपत नाही म्हणून अन्याय मुकाट्याने सहन करत असतात. पण अशा स्त्रियांना मदत करण्यासाठी सुजाता मागे-पुढे पाहत नाहीत. आपल्याला शुल्क कमी मिळेल, असा विचार त्या करत नाहीत. अनेक स्त्रियांना त्यांनी कमी शुल्क घेऊन कायदेशीर सल्ला दिला आहे. तसेच त्यांनी पुढे आयुष्यात काय करावे, कसे जगावे याबाबत मार्गदर्शनही केले आहे. सुजाता लाड या अनेक सामाजिक संस्थांशी जोडलेल्या आहेत. या संस्थांमार्फत त्या तळागाळातील ग्रासलेल्या स्त्रियांना सर्वतोपरी मदत करतात. त्यांना मोफत कायदेशीर सल्ला देतात. क्वचितच एखादा वकील असे करत असेल.

 

सुजाता यांची आणखी एक ओळख म्हणजे त्या ‘सेक्शुअल हॅरेसमेंट अॅट वर्कप्लेसच्या मुंबई विभागाच्या समितीवर कार्यरत आहेत. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शोषणाविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी अनेक स्त्रियांना मदत केली आहेकायद्याचे ज्ञान हे सर्वांना असावे, असे सुजाता सांगतात. “एक स्त्री म्हणून, मुलगी म्हणून, पत्नी म्हणून, बहिण म्हणून तसेच एक ज्येष्ठ महिला म्हणूनही स्त्रियांना त्यांचे हक्क व ते मिळवण्यासाठी कायद्यात असलेल्या तरतुदी माहित असल्याच पाहिजेत. तरच आजची स्त्री ही खऱ्या अर्थाने प्रगती करेल,” असे मत त्या व्यक्त करतात. “तसेच आज स्त्रियांच्या सुरक्षेविषयीचे प्रश्न वाढले आहेत. प्रत्येक स्त्रीने आज चौकसवृत्ती अवलंबावी. प्रत्येकीने सजग राहावे, मग ती सजगता, सतर्कता कायद्याच्या बाबतीतही असावी,” असे सुजाता आवर्जून सांगतात. प्रत्येक स्त्रिला तिच्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे हे माहीत असायला हवेत. मुळात स्त्रिचा संघर्ष हा तिच्या जन्मापासूनच सुरू होतो. गर्भ पोटात असतानाच लिंग पडताळणी चाचणी करण्याचा चुकीचा प्रकार काही लोकं करतात. त्यानंतर मुलगी नको असेल, तर गर्भपात केला जातो. सुदैवाने या प्रक्रियेतून ती वाचलीच, तर पुढे जन्माला आल्यावर त्या मुलीला घरात केल्या जाणाऱ्या लिंगभेदाचा सामना करावा लागतो. यासारख्या चुकीच्या गोष्टींना आपण खतपाणी घालायला नको, असे आपले मत सुजाता परखडपणे व्यक्त करतात.

 

तसेच आजकाल समाजात घटस्फोटांच्या वाढलेल्या प्रमाणाबद्दल सुजाता सांगतात की, “हल्लीच्या मुला-मुलींना तडजोड करायला आवडत नाही. दोघांचे राहणीमान, शिक्षण, कार्यक्षेत्रातील फरक हे घटस्फोट घेण्याचे कारण ठरते. अगदी क्षुल्लक कारणावरूनही घटस्फोट होतात. पत्नीने किंवा पतीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटचा पासवर्ड दिला नाही, म्हणून न्यायालयात घटस्फोटासाठी धाव घेतली जाते.” अॅडव्होकेट सुजाता लाड यांना अनेक संस्थामार्फत महिला दिनानिमित्त, सणसमारंभाला, कार्यक्रमाला स्त्रियांसाठी असलेल्या कायद्याविषयी बोलण्यासाठी आमंत्रित केले जाते.

 

एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीला मदत करणे, तिला संकटातून बाहेर काढणे, असे जर सर्व स्त्रियांनी ठरवले, तर स्त्रियांचे कित्येक प्रश्न त्या आपापसांतच सोडवू शकतील. परंतु त्यांना मग कायद्याची गरज भसणार नाही, असा याचा अर्थ होत नाही. कायदा हा सर्वश्रेष्ठ आहेच. कारण तो सर्वांना समान लेखतो. आज न्यायव्यवस्था अस्तित्वात आहे म्हणूनच समाजात सुव्यवस्था नांदते आहे. त्यामुळे जर कोणावर अन्याय होत असेल, तर न्यायासाठी दाद अवश्य मागावी. न्याय हा मिळणारच!

 - साईली भाटकर

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
@@AUTHORINFO_V1@@