मन करा रे प्रसन्न!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2018
Total Views |


 

 

आता ‘मी पुढे काय करायला पाहिजे,’ असा विचार करणारी माणसं पुढे यशस्वी होतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूतकाळात न रमता, भविष्यात न डोकावता, आत्ता वर्तमानात जे घडते आहे, त्याकडे लक्ष केंद्रीत करून समस्यांचे निराकरण करण्यातच शहाणपण आहे.
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


या जगात आपण जन्म घेतल्यावर एक चेतना देणारा अवयव आपल्या अस्तित्वाबरोबर जन्म घेतो, तो म्हणजे आपल मन. या मनाचं अस्तित्व आपण या पृथ्वीतलावर आल्या आल्या सुरू होतं. या अस्तित्वाचं स्वरूप रडण्याकडे, निरागस हसण्याकडे व्यक्‍त होत असतं. जसजशी वर्षे संपतात, वय वाढू लागतं, तसतसं मनाचं अस्तित्व अधिकाधिक प्रगल्भ होत जातं. पण, तरीही बाल्यकाळातील ती निरागस विचारांची माळ तुटून प्रौढ विचारांचा गराडा मनाला भोवतो. कितीही प्रयत्न केला तरी काहीजणांना या विचारांच्या गंभीर वलयातून बाहेर निघायला सहजासहजी जमत नाही. भूतकाळात केलेल्या चुकांच्या माऱ्यातून कधी सुटका होत नाही, तर कधी भविष्यकाळात आपले भले होईल की नाही, या असमायानात मन वाहत जाते. प्रेमभंग झाल्यानंतर प्रेमपत्रांचे काय करावे, हे कळत नाही. तसेच सध्याच्या नोकरीत प्रचंड कंटाळा आला आहे, प्रगती थांबली आहे, अशा वेळी नवीन नोकरीसाठी अर्ज कसे करायचे, ही चिंता डोक्याला त्रास देत असते. तसं पाहिलं तर या विश्वातील प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी जरूरीपेक्षा जास्त प्रमाणात विचार करीत असते. पण, काही लोकांच्या बाबतीत मात्र विचारांचा सतत होणारा भडीमार थांबविणे केवळ अशक्यप्राय गोष्ट होऊन बसते. आपल्या मनातील स्वगतं जर सकारात्मक आणि प्रेरणादायी असतील, तर काही हरकत नाही; पण खूप थोड्या सुदैवी लोकांच्याबाबतच ही स्वगतं विकास करणारी असतात. बहुतांश लोकं याबाबत तशी दुदैवीच म्हणायला पाहिजेत. कारण, त्यांच्या मनात सातत्याने चिंता देणारे विचार, मन सरभरीत करणारे विचार हे घोळत असतात. हे रवंथ भूतकाळातील विचारांचे वा कृतीचे पुन्हा पुन्हा नामस्मरण केल्यासारखे असते. ‘मी असे बोलायला नको होते, मी तसे करायला नको होते, माझी प्रगती होणाराचनाही,’ इ. या सतत येणाऱ्या विचारांमुळे ही मंडळी आयुष्यात काहीतरी विधायक करायचे ठरविले, तरी तसे करू शकत नाहीत. कारण अतिविचार करण्याची त्यांची सवय त्यांना भविष्याकडे सकारात्मक पाहायला देत नाही. अतिविचार करत स्वतःला व्यक्ती केवळ त्रास करून घेतेच, पण त्यांच्या स्वास्थावरत्यांचा वाईट परिणाम होत असतो.मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून स्वतःच्या चुकांवर, दोषांवर आणि समस्यांवर सतत लक्ष केंद्रीत करणाऱ्या लोकांचे मानसिक आरोग्य बिघडते. जेव्हा तुमचे मानसिक आरोग्य बिघडते, तेव्हा तुमची नकरात्मक गोष्टी चघळत बसायची समस्या अधिक वाढते. अशा पद्धतीचे दुष्टचक्र भेदणे पुढे कठीणच होते. गंभीर प्रकारच्या भावनिक समस्या निर्माण होतात. आपण या सगळ्या त्याच त्याच जुन्या विचारांना आपल्या कपाटात ठेवलेल्या अनावश्यक गोष्टी साठवतो तशा का साठवून ठेवतो? कारण, त्या कपाटातील जुन्या गोष्टी गरजेच्या नसल्या तरी आपण त्यात भावनेनेगुंतलेलो असतो.
 

ती आपली गरज असते. पण, काही काळानंतर साचलेल्या या गोष्टी आपल्या मनाला पूर्ण नियंत्रणामध्ये ठेवतात. आपण इतर आवश्यक व विधायक विचार करण्याची क्षमता गमावतो. पण, आपल्याला आवश्यक असणाऱ्या व आवडणाऱ्या गोष्टी ठेवण्यासाठी कपाटातून कितीही भावूक वाटले तरी काही नको असलेल्या गोष्टी काढून टाकायच्या असतात. तसेच काहीसे आपल्याला आपल्या भूतकाळातील अनुत्पादकविचारांना घालवण्यासाठी करायला लागते.यासाठी आपल्याला या सातत्याने विक्रमादित्याच्या पाठीवर येऊन बसणाऱ्या वेताळस्वरूप विचारांची जाणीच करून घ्यायला हवी. आपण आपल्या विचारांचे परिक्षण केले पाहिजे. त्याच त्याच त्रासदायक विचारांची रेकॉर्ड आपले मन पुन्हा पुन्हा वाजवित आहे व आपण काही विधायक विचार किंवा गोष्टी करू शकत नाही, हे आपल्याला पटले पाहिजे; तरच यातून सुटका करून कशी घ्यायची, याचे नियोजन आपल्याला करता येईल. आपल्याला क्‍लेशदायक, नकारात्मक विचारांबरोबर वाहवत जाणे खूप सोपे आहे. म्हणून या विचारांनी आपल्याला भ्रमिष्ट करण्याआधीच त्या विचारांना ओळखूनमनातून परिश्रमाने व जिद्दीने हाकलून देणे आवश्यक आहे. त्याच त्याच विचारांत हरवून जाण्यापेक्षा आपण त्यातून मार्ग कसा काढायचा, त्यातून उत्तर कसे मिळवायचे, याचा चतुर विचार माणसाला करता आला पाहिजे. ‘हे असे कसे झाले?’ याचा विचार करण्यापेक्षा आता ‘मी पुढे काय करायला पाहिजे,’ असा विचार करणारी माणसं पुढे यशस्वी होतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूतकाळात न रमता, भविष्यात न डोकावता, आत्ता वर्तमानात जे घडते आहे, त्याकडे लक्ष केंद्रीत करून समस्यांचे निराकरण करण्यातच शहाणपण आहे.

 

- डॉ. शुभांगी पारकर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@