होमियोपॅथीची मूलभूत तत्त्वे औषध सिद्धता - ( भाग-2)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2018
Total Views |


 

मागील भागापासून आपण होमियोपॅथिक औषध सिद्धतेविषयी माहिती घेत आहोत. याबद्दल अजून काही उपयुक्त माहिती आपण आजच्या भागातही घेणार आहोत. आज आपण ज्या माणसांवर औषध सिद्धताकेली जाते (Prover) अशा सिद्धकर्त्यांच्या गुणांबद्दल माहिती घेऊ.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

आदर्श सिद्धकर्ता (ideal prover)

आदर्श सिद्धकर्ताहा मुख्यत्वे निरोगी असावा. कारण औषधांची चाचणी ही आजारी माणसांवर घेता येत नाही. जर आजारी माणसावर चाचणी घेतली, तर त्या माणसाच्या आजाराची लक्षणे व नवीन औषधांनी माणसाच्या शरीरात निर्माण झालेली लक्षणे यांची गुंतागुंत होते आणि औषधाच्या गुणधर्माचा अभ्यास करणे कठीण होऊन जाते. याशिवाय आजारपणामुळे माणसाचा औषधाला प्रतिसाद देण्याचा गुणधर्मसुद्धा बदलतो. म्हणून नेमके गुणधर्म आपल्याला कळून येत नाहीत. आदर्श सिद्धकर्ताहा निरोगी तर असावाच, पण त्याचबरोबर हुशारही असावा. औषधांचे परिणाम त्याला नेमके नमूद करून ठेवता आले पाहिजेत. त्याचबरोबर औषधामुळे जी लक्षणे निर्माण होतात, त्या लक्षणांची तीव्रता किंवा संवेदनशीलता ही नेमकी मांडता आली पाहिजेत. अशामुळे त्या औषधाचे नेमके परिणाम आपल्याला कळून येतात. याशिवाय आदर्श सिद्धकर्ताहा नाजूक, संवेदनाक्षम व प्रतिक्रिया देणारा असावा. याचे कारण असे की, सिद्धतेसाठी दिल्या जाणार्‍या औषधाचे परिणाम अशा लोकांवर त्वरीत किंवा लवकर दिसून येतात व त्यामुळे या औषधांचे पूर्ण गुणधर्म समजून येण्यास फार मदत होते. संवेदनक्षम असल्यामुळे अशा माणसांत या औषधाची अनेक बारीक लक्षणे व चिन्हेसुद्धा बघायला मिळतात.

 

यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म सिद्धकर्त्यामध्ये असावा लागतो, तो म्हणजे प्रामाणिकपणा व विश्‍वासार्हता. जर सिद्धकर्ता हा प्रामाणिक असेल, तर तो अत्यंत प्रामाणिकपणे व विश्‍वासाने औषधाचे त्याच्या शरीरावर व मनावर होणारे छोट्यात छोटे परिणामही लिहून ठेवतो व जे सत्य आहे तेच लिहून ठेवतो. संशयाला कुठल्याही प्रकारची जागा तो ठेवत नाही किंवा कुठलेही चिन्ह वा लक्षण तो जास्त रंगवून वा वाढवून सांगत नाही. जे तो खरे आहे तेच सांगतो. त्यामुळे होमियोपॅथीक औषध सिद्धताही मुख्यत्वे सत्वगुणी माणसेच जास्त व्यवस्थितरित्या सांगतात. या माणसांमध्ये एक महत्त्वाच्या जबाबदारीची तीव्र जाणीव असते. याशिवाय हे लोक हे अतिशय विश्‍वास ठेवण्याच्या पातळीचे असतात. जे लोक अशा जबाबदारीच्या जाणीवेने पूर्ण असतात, असेच लोक ही औषध सिद्धताप्रभावीपणे पुढे नेतात व पूर्ण करतात. औषधाच्या मिळणार्‍या या लक्षणे व चिन्हांचा माणसाच्या आरोग्यासाठीच उपयोग होणार आहे, हे जाणल्यामुळे हे लोक अतिशय शुद्ध ध्येय ठेवून या औषधांची सिद्धता करतात. म्हणजेच काम तर शुद्ध सात्विक मनाची माणसेही अतिशय उत्तम सिद्धकर्ती ठरतात. याचबरोबरीने ही औषधे सर्व वयोगटातील माणसांवर सिद्ध करता येतात व वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या माणसांवरही सिद्ध करता येतात. पुरुष व स्त्रिया अशा दोन्ही सिद्धकर्त्यांवर ही औषधे सिद्ध करता येतात. ज्यामुळे सर्व प्रकारचे औषधी गुणधर्म व प्रत्येक औषधाची ठराविक आत्मीयता व लक्षणे तयार करण्याची शक्ती ही अभ्यासता येते. अशाप्रकारे वेगवेगळ्या वयोगटातील लोकांवर औषध सिद्धताकरून त्या औषधाचे अत्यंत बारकाईने परीक्षण केले जाते व ते गुणधर्म जे लक्षणे व चिन्हांच्या स्वरूपात मिळतात, त्याची नोंद केली जाते. औषध सिद्धतेविषयची माहिती पुढील भागातही चालू राहील.

- डॉ. मंदार पाटकर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@