गोविंदांचा थरार, ६० जखमी तर एकाचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2018
Total Views |



 

 

मुंबई : दहीहंडीनिमित्त आज सकाळपासूनच मुंबईसह ठाणे व उपनगरातही गोविंदा पथकांचा उत्साह पाहायला मिळातोय. सगळीकडे जल्लोषाचे वातावरण आहे. दादर, लालबाग, वरळी, भायखळा, प्रभादेवी, माहीम, माटुंगा तसेच ठिकठिकाणी लहानमोठ्या हंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई शहर आणि उपनगरात राजकीय हंड्यांपासून सामाजिक हंड्यांचे आयोजन करण्यात आले आहेसर्वांचे लक्ष लागून असलेल्या ठाण्यामध्ये मोठ्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदांनी कूच केली आहे. ठाण्यातील मनसेची २१ लाख रुपयांची दहीहंडी जोगेश्वरीतील जय जवान या गोविंदा पथकाने फोडली आहे. 
 

रवींद्र कांबळे (वय ३७), सचिन गायकवाड (वय ३०) आणि वेद कुलाबकर (वय ९) या तीन गोविंदावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी झालेल्या आकाश माळी (वय १६) मुलावर व्ही. एन. देसाई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेतया सर्व गोविंदांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितले जात आहे. 

 
दुपारपर्यंत जखमींचा आकडा ६० पर्यंत पोहचला आहे. या सर्व गोविंदांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबईतील धारावी येथील एका २७ वर्षीय गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचे नाव कुश खंदारे असून सायन रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू होते.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@