भारताचा पाकिस्तानवर पुन्हा एकदा 'सर्जिकल स्ट्राईक'?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2018
Total Views |


 


केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा दावा

 

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक सारखी मोठी कारवाई केल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला. उत्तर प्रदेश मधील मुजफ्फरपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा दावा केला. याबाबत लवकरच मोठी घोषणा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय सैन्यासोबत आम्ही क्रूरता कदापि सहन करणार नाहीत. आम्ही जशाच तसे उत्तर देऊ मात्र शेजारी असल्याने पहिल्यांदा आम्ही गोळी चालवणार नाही. समोरून गोळी आली तर आम्ही त्यांना त्याच भाषेत उत्तर देऊन ठेचून काढू असे यावेळी त्यांनी ठामपणे सांगितले.
 

मागील काही दिवसांपासून सीमेलगत काश्मीरपरिसरात सैनिक पोलिसांची अमानुष हत्या केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सिंह म्हणाले की, "तुम्हाला याबाबत माहिती नसेल मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून सीमेवर काही तरी घडत आहे. भारतीय सैनिकांनी मोठी कारवाई केली असून सैनिकांच्या हत्येचा बदला घेतला आहे. याबाबत मी आताच काही सांगणार नाही मात्र जे काही झालं आहे ते ठीक ठाक झालं आहे. लवकरच तुम्हाला याविषयी माहिती मिळेल."

 

यापूर्वी २०१६ साली भारतीय सैनिकांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले होते. सैन्याच्या याच जबरदस्त कामगिरीची आठवण म्हणून या कारवाईला वर्ष पूर्ण झाल्यामुळे देशातील शाळांमध्येपराक्रम पर्वनावाने सर्जिकल स्ट्राइक दिवस साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@