बोरिवली हे मुंबईतील पहिले अंधमित्र रेल्वेस्थानक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2018
Total Views |



बोरिवली : दृष्टिहिनांना आता बोरिवली रेल्वेस्थानकात कोणतीच अडचण येणार नाही. बोरिवली रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचे कठडे, निर्गमन ठिकाणे आणि भुयारी मार्गातील कठडे यांवर ब्रेल लिपीत मजकूर कोरण्यात आला आहे. तसेच स्थानकात ब्रेल लिपी मजकूरातील माहितीपर पुस्तिका अंध प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तिकीट खिडकीवर ही पुस्तिका मिळेल. आंतरराष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त कॉक्स अँड किग्ज फाउंडेशन अनुप्रयास आणि पश्चिम रेल्वे यांनी मिळून हा उपक्रम राबवला आहे.

 

दृष्टिहिनांना रेल्वे प्रवास करताना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी एक सर्वेक्षण करण्यात आले होते. रेल्वेस्थानकाचा नकाशा माहित नसल्याने तेथे असलेल्या विविध सेवा सुविधांचा लाभ घेणे दृष्टिहिनांना शक्य होत नाही. परंतु आता मात्र ते शक्य होणार आहे. बोरिवली रेल्वेस्थानकात विशेष इंडिकेटरही उभारण्यात आला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@