देशात पुन्हा पोलिओ पसरणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2018
Total Views |

 

 

 
 
 
नवी दिल्ली : भारतातून पोलिओ पूर्णत: हद्दपार झाला असला तरी हा आजार पुन्हा परतण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद मधील बायोमेड कंपनीने तयार केलेल्या लसींमध्ये टाइप – २ चा पोलिओ व्हायरस आढळून आल्याने देशभरात एकच खळबळ माजली आहे. बायोमेड कंपनीच्या या व्हायरसयुक्त लसींचा पुरवठा उत्तर प्रदेश व महाराष्ट्र राज्यात होत असल्याने दोन्ही राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 

उत्तर प्रदेशातील काही मुलांच्य विष्ठेमध्ये पोलिओ टाइप – २ चे हे व्हायरस आढळून आले. त्यामुळे बायोमेड कंपनीच्या लसींची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. त्या लसींमध्ये हे पोलिओ टाइप – २ चे हे व्हायरस असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे बायोमेड कंपनीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@