नाना देणार रोखठोक उत्तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2018
Total Views |


 

 

जयपूर: अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले होते. यावरून बॉलिवूडमध्ये दोन गट पडले असून अनेकांनी आपली मते व्यक्त केली. आता एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार नाना पाटेकर पत्रकार परिषद घेऊन लावलेल्या आरोपांना उत्तर देणार असल्याची माहिती खुद्द नानांनी दिली आहे.

 

" सध्या मी जैसलमेरमध्ये एका चित्रपटाचे शूट करत आहे. इथून मुंबईला परतल्यानंतर एक पत्रकार परिषद घेणार आहे. तुम्ही मला कोणतेही प्रश्न विचारू शकता. मी काहीही लपवणार नाही. तसे करण्याची काहीच गरज नाही." असे नानांनी रोखठोकपणे सांगितले आहे. तनुश्रीला मिळणाऱ्या पाठिंब्याबाबतही त्यांना विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी सांगितले की, "कोणी कोणावर विश्वास ठेवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे."

 

आपली बाजू मांडतांना त्यांनी सांगितले की, " मी एवढा नीच माणूस आहे असे तुम्हाला वाटते का? लोकांना माझ्याबद्दल काही माहिती नाही का? मी चित्रपटांमध्ये नाचणे टाळतो. मग मी असे अश्लील नाचगाणे करण्यासाठी सांगेन का?" असे प्रश्न त्यांनी मांडले. " मी या सर्व गोष्टींचे उत्तर सर्व लोकांसमोर देईन आणि मला विश्वास आहे की लोकं याशिवाय कुठल्याही निर्णयावर पोहचणार नाहीत असेही आशा व्यक्त करतो." असा विश्वास त्यांनी दर्शविला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@