इंडोनेशियात त्सुनामीचे थैमान; ३८४ जण मृत्युमुखी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2018
Total Views |


 

 

जकार्ता: मध्य इंडोनेशियातील सुलावेसी या बेटावर शुक्रवारी त्सुनामी आणि भूकंपाचा कहर पाहायला मिळाला. यामध्ये आतापर्यंत ३८४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली. पालू शहरात पहिला धक्का हा ७.५ रिश्टर स्केलचा होता तर पुन्हा तासाभराने दुसरा धक्का बसला. आतापर्यंत ३८४ जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे तर इतरांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

 

इंडोनेशियाच्या आपत्ती निवारण विभागाचे प्रमुख रेहमत त्रियोनो म्हणाले, पालू शहरसह भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून सुमारे ८० किलोमीटरवरील शहरांना त्सुनामीचा तडाखा बसला आहे. इंडोनिशियाचा जगातील प्रमुख भूकंप प्रवण क्षेत्रात समावेश होतो. सुलावेसी बेटाची राजधानी पालूपासून ७८ किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा केंद्र सुमारे दहा किलोमीटर खोलीवर होता.

 

भूकंपाची तीव्रता इतकी मोठी होती की, भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून दक्षिणेकडील सुमारे ९०० किलोमीटरवरील माकासर शहरात धक्के जाणवले. पालूपासून १७५ किमी अंतरावरील तोराजा येथील स्थानिक रहिवासी लिसा सोबा पालोन यांनी शुक्रवारी भूंकपाचे तीव्र धक्के जाणवल्याचे सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@