पाकिस्तानच्या कुरापतींमुळे चर्चा रद्द: सुषमा स्वराज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2018
Total Views |


 
 

न्यूयॉर्क: पाकिस्तान हा असा देश आहे ज्यामध्ये दहशतवाद पसरवण्यामध्ये आणि आपले कुकर्म नाकारण्यामध्ये तरबेज आहेत. पाकिस्तानने केलेल्या कुरापतींमुळे ही चर्चा रद्द केली आहे.असे वक्तव्य परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी केले. त्या शनिवारी संयुक्त राष्ट्राच्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७३व्या सत्राला संबोधित करत होत्या. न्यूयॉर्क येथे ही सभा पार पडली.

 

पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी नंदनवन असून २६/११ च्या हल्ल्यातील मास्टरमाईंड उघड माथ्याने हिंडत असल्याचा आरोप सुषमा स्वराज यांनी केला. पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासमोर चर्चेसाठी प्रस्ताव ठेवला होता आणि भारतही तयार होता. परंतु, पाकिस्तानने भारताच्या तीन जवानांचे अपहरण करून एकाची हत्या केली. यामुळे भारताने पाकिस्तानला नकार दिल्याचे, सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले. वातावरण बदलाचा विकसित देशांपेक्षा छोट्या छोट्या आणि विकसनशील देशांना मोठा फटका बसत आहे. कारण या देशांकडे आपत्तींशी लढण्यासाठी साधने नाहीत.

 

संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीमध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या योजनांच्या यशस्वीतेचा आढावा घेतला. जन धन योजनेमुळे भ्रष्टाचार कमी झाला, ३२ कोटी लोकांनी बँकांमध्ये खाती उघडल्याचे सांगतानाच वातावरणातील बदल आणि दहशतवाद या मोठ्या समस्या बनल्या असल्याचे त्यांनी सांगितले. इंडोनेशियाला भुकंपाचा धक्का बसल्यानंतर त्सुनामीने हाहाकार माजवला असून भारत त्यांच्या सोबत आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@