फेसबुकची ५ कोटी अकाऊंट हॅक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2018
Total Views |

 

 
 
 
 
वॉशिग्टन : फेसबुक या जगप्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईटची तब्बल ५ कोटी अकाऊंट हॅकर्सनी हॅक केली आहेत. एका पत्रकार परिषदेदरम्यान फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी ही माहिती जगभरातील प्रसारमाध्यामांना दिली. हॅक झालेले हे ५ कोटी अकाऊंट्स कोणत्या देशातील आहेत हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. परंतु या ५ कोटी अकाऊंट्समध्ये भारतीय अकाऊंट्सचाही समावेश असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
 

फेसबुकने view as हे फिचर वर्षभरापूर्वी सुरू केले होते. या फिचरच्या सुरक्षा यंत्रणेत असलेले दोष हॅकर्सनी हेरले आणि ५ कोटी अकाऊंट हॅक करण्यात आली असे फेसबुककडून सांगण्यात आले आहे. View as हे फिचर आता बंद करण्यात आले आहे. तसेच फेसबुक यूजर्सना आपल्या अकाऊंटचा पासवर्ड बदलण्याची गरज नाही आहे. असे फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@